आरटीई प्रवेशाची यादी आज होणार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:12 IST2021-04-15T04:12:52+5:302021-04-15T04:12:52+5:30

अमरावती : आरटीई अंतर्गत प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची यादी गुरुवार, १५ एप्रिल रोजी संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्या संदर्भातील ...

The list of RTE admissions will be announced today | आरटीई प्रवेशाची यादी आज होणार जाहीर

आरटीई प्रवेशाची यादी आज होणार जाहीर

अमरावती : आरटीई अंतर्गत प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची यादी गुरुवार, १५ एप्रिल रोजी संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्या संदर्भातील संदेश पालकांना नोंदणीकृत भ्रमणध्वनीवर येतील, अशी माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने दिली.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम आतील तरतुदीनुसार २०२१-२२ या शैक्षणिक वषार्तील प्रवेशासाठी राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार प्रवेश पात्र शाळांची नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे. आरटीईनुसार कायम विनाअनुदानित विनाअनुदानित उत्साहित शाळेमध्ये २५ टक्के इतक्या जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. यासाठी एकाच टप्प्यात लॉटरी ७ एप्रिल रोजी काढण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुभार्वामुळे लॉटरी प्रक्रियाही नेहमीप्रमाणे हॉलमध्ये आयोजित न करता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यस्तरावर काढण्यात आली आहे.

बॉक्स

प्रवेशासाठी ही कागदपत्रे हवेत

प्रवेशासाठी रहिवासी पुरावा, जन्माचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला तसेच विद्यार्थी अपंग असल्यास जिल्हा शल्यचिकित्सक वैद्यकीय अधीक्षक अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालयाचे ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंग असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. शासनाच्या संकेतस्थळावर या बाबत सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कोट

प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची यादी व प्रवेशाबाबत सविस्तर सूचना गुरुवारी संकेतस्थळावर उपलब्ध होईल. त्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवेशाबाबत शिक्षण विभागामार्फत वरिष्ठ स्तरावरून प्राप्त सूचनेप्रमाणे कारवाई केली जाईल.

- ई.झेड खान,

शिक्षणाधिकारी प्राथमिक

Web Title: The list of RTE admissions will be announced today