बँकांना मागविली पीक विम्याच्या यादी
By Admin | Updated: June 28, 2016 00:15 IST2016-06-28T00:15:50+5:302016-06-28T00:15:50+5:30
जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी खरीप २०१५ करिता पीक विमा काढला होता, त्यांना पीक विम्याची मदत मिळणार आहे.

बँकांना मागविली पीक विम्याच्या यादी
बैठकीत जिल्हा प्रशासनाच्या सूचना : शेतकऱ्यांना दुष्काळाची मदत
अमरावती : जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी खरीप २०१५ करिता पीक विमा काढला होता, त्यांना पीक विम्याची मदत मिळणार आहे. परंतु ज्या शोकऱ्यांनी विमा काढला नव्हता त्यांनादेखील कापूस व सोयाबीन पिकांसाठी पीक विमा जाहीर झाल्याच्या ५० टक्के प्रमाणात शासन मदत देणार आहे. परंतु विमा न काढलेले शेतकरी कोणते हे ओळखण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला त्यांची यादी जिल्हा प्रशासनाने बँकांना मागविली आहे.
कमी पावसामुळे उद्भवणारा दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, पूर, चक्रीवादळापासून पिकांना होणाऱ्या नुकसानीसाठी भरपाई मिळावी, मागील वर्षी जिल्ह्यातील १ लाख ४९ हजार ४९२ शेतकऱ्यांनी १ लाख ४१ हजार ७९ हजार हेक्टर क्षेत्राचा विमा काढला.
यासाठी २८ कोटी ९ लाखांचा भरणा केला. यापैकी १ लाख २ हजार ९०५ शेतकऱ्यांना ८७ कोटी ४७ लाख रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आला.
नुकसान भरपाई लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार या शेतकऱ्यांची यादी सर्व बँकांनी तहसीलदारांना द्याव्यात, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. ज्यांनी विमा काढला नाही, अशा शेतकऱ्यांना मदत व्हावी, यासाठी पीक विमा जाहीर झाल्याच्या निम्म्या प्रमाणात मदत शासन देणार आहे. (प्रतिनिधी)