जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी १६८७ मतदारांची यादी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 05:00 IST2021-08-15T05:00:00+5:302021-08-15T05:00:57+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने तब्बल ११ वर्षांनंतर अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक होणार आहे. सप्टेंबर महिन्याअखेर अथवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ही निवडणूक होणार आहे. १४ ऑगस्टपासून पुढे ४५ दिवसात एकुणच निवडणूक प्रक्रिया पार पाडणे ही नियमावली आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत एकत्र बसणारे नेते या निवडणुकीत एकमेकांविरूद्ध शड्डू ठोकतील, असे चित्र दिसून येत आहे.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी १६८७ मतदारांची यादी जाहीर
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक संचालक निवडणुकीच्या अनुषंगाने शुक्रवारी उशिरा सायंकाळी मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात १६८७ मतदार असून, २१ संचालक पदासाठी निवडणूक होणार आहे. येत्या १० दिवसात सहकारी बॅंकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल, अशी माहिती आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने तब्बल ११ वर्षांनंतर अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक होणार आहे. सप्टेंबर महिन्याअखेर अथवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ही निवडणूक होणार आहे. १४ ऑगस्टपासून पुढे ४५ दिवसात एकुणच निवडणूक प्रक्रिया पार पाडणे ही नियमावली आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत एकत्र बसणारे नेते या निवडणुकीत एकमेकांविरूद्ध शड्डू ठोकतील, असे चित्र दिसून येत आहे.
असे निवडून येतील २१ उमेदवार
सहकारी नागरी बॅंक मतदार संघातून १, वैयक्तिक मतदार संघ १, सेवा सहकारी सोसायटीमधून १४, महिलांमधून २, ओबीसीतून १, अनुसूचित जातीमधून १ तर व्हीजेएनटी प्रवर्गातून १ असे २१ उमेदवार निवडून येतील, अशी निवडणुकीची रचना आहे.
पाच उमेदवारांसाठी स्वतंत्र मतदानाचा हक्क
वैयक्तिक मतदार संघ, सहकारी नागरी बॅंक मतदार संघ, १४ सेवा सहकारी सोसायटी प्रवर्गातील १६ उमेदवारांना मतदान करावे लागेल. याशिवाय दोन महिला, ओबीसी १, अनुसूचित जाती १ आणि व्हीजेएनटी प्रवर्गातील १ असे पाच उमेदवारांना स्वंतत्रपणे एकूण १६८६ मतदारांना मतदानाचा हक्क बजावावा लागणार आहे.
तालुकानिहाय मतदार
अमरावती : ४३, धामणगाव रेल्वे : ३३, धारणी : १९, अचलपूर : ५०, चिखलदरा: १६, वरुड : ६०, भातकुली : ४०, नांदगाव खंडेश्वर : ३९, चांदूर रेल्वे : ३०, दर्यापूर : ७५, चांदूर बाजार :४१, मोर्शी : ६७, अंजनगाव सुर्जी : ५६, तिवसा : ३६