अमरावती : तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनमधील शुक्रवार मद्यशौकिनांसाठी ‘गुड न्यूज’ देणारा ठरला. जिल्ह्यातील शिराळा व वरूड पालिका हद्द वगळता, ८ मे रोजी अन्य देशी-विदेशी दारू दुकाने उघडतील, असा आदेश दोन दिवसांपूर्वी निघाला. शुक्रवारी त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली. दारू दुकानांचे सील उघडण्यात आले आणि शौकिनांच्या आनंदाला पारावार उरला नाही.एखाद्या योजनेचा लाभ घेण्यासाठी जसे आधार कार्ड अनिवार्य आहे, अगदी त्याप्रमाणे शौकिनांनी आधार कार्ड बाळगत, मास्क लावून आणि फिजिकल डिस्टन्सिंग पाळत दारू खरेदी केली. मात्र, खरेदीदारांची संख्या वाढल्याने रांग वाढत गेली अन् फिजिकल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाला. बाकी टोकन देऊन, मागणी फॉर्म भरून दारू विक्री करण्यात आली. विशेष म्हणजे, एकूणच सर्व दारू दुकानांना पोलिसांनी सुरक्षा पुरविली.शिराळा, वरूडमध्ये परवानगी नाहीवरूड नगरपालिका क्षेत्रात तीन महिला कोरोनाबाधित आढळल्याने दारूविक्रीस परवानगी देण्यात आली नाही. तसे आदेशच राज्य उत्पादन शुल्क विभाग व जिल्हा प्रशासनाने काढले. शौकिनांनी लगतच्या जरूडमध्ये दारू खरेदीसाठी गर्दी केली. अमरावती तालुक्यातील शिराळा येथे चौघांना कोरोना संसर्ग झाल्याने दारूविक्र ीस मनाई करण्यात आली.पहिल्याच दिवशी 75 लाखांच्या दारूचा खप‘लॉकडाऊन’नंतर प्रथमच ग्रामीण भागात शुक्रवारी सुरू करण्यात आलेल्या दारूविक्रीतून ७५ लाखांचा महसूल मिळाल्याची माहिती एक्साइजचे अधीक्षक राजेश कावळे यांनी ‘लोकमत’ला दिली. अमरावती महापालिका, वरूड नगर परिषद, शिराळा ग्राम वगळता जिल्ह्यातील अन्य भागांत मद्यविक्रीची दुकाने सुरू झाली आहेत. परतवाडा येथे संकुलात दोन दुकाने असल्यामुळे ती सुरू झाली नाहीत. वलगाव, नांदगाव पेठ येथील दुकाने येत्या एक-दोन दिवसात सुरू होतील. ही दुकाने गर्दी होण्याच्या शक्यतेने उशिरा सुरू करण्याचा ंिनर्णय संचालकांनी घेतला आहे. शुक्रवारी ४८ हजार देशी दारू, आठ हजार लिटर बीअर आणि सहा हजार लिटर विदेशी दारूचा खप झाला. त्याची किंमत ७५ लाखांच्या घरात आहे. पहिल्या दिवशी १२ वाइन शॉप, पाच बीअर शॉपी आणि ९३ देशी दारूची दुकाने सुरू झाली. जिल्ह्यात ३२ वाइन शॉप, २९ बीअर शॉपी, १३५ देशी दारू दुकाने आणि २५० बार-रेस्टॉरंट आहेत.
खाकीच्या उपस्थितीत दारूविक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 05:00 IST
एखाद्या योजनेचा लाभ घेण्यासाठी जसे आधार कार्ड अनिवार्य आहे, अगदी त्याप्रमाणे शौकिनांनी आधार कार्ड बाळगत, मास्क लावून आणि फिजिकल डिस्टन्सिंग पाळत दारू खरेदी केली. मात्र, खरेदीदारांची संख्या वाढल्याने रांग वाढत गेली अन् फिजिकल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाला. बाकी टोकन देऊन, मागणी फॉर्म भरून दारू विक्री करण्यात आली. विशेष म्हणजे, एकूणच सर्व दारू दुकानांना पोलिसांनी सुरक्षा पुरविली.
खाकीच्या उपस्थितीत दारूविक्री
ठळक मुद्देशिराळा, वरूडमध्ये परवानगी नाही