शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
4
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
5
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
6
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
7
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
8
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
9
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
10
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
12
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
13
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
14
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
15
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
16
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
17
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
18
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
19
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
20
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?

पोलीसठाण्यालगत भररस्त्यावर दारुचा अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 05:00 IST

दिवसभर आणि रात्रीही ज्या मुख्य मार्गावर दारू ढोसली जाते त्याच मार्गावर व्यसनमुक्तीची देशभर चळवळ राबविणाऱ्या गाडगेबाबांचे समाधीमंदीर आहे. जगविख्यात गाडगेबाबा मंदीरमार्गावर वावरणाऱ्या दारूड्यांमुळे, उघडपणे चालणाऱ्या दारूच्या गुत्त्यामुळे गाडगेबाबांच्या विचारांनी प्रेरित होऊन दूरदूरून येणारे अभ्यासक, भक्त, अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ते बुचकाळ्यातच पडतात.

अमरावती : एक अत्यंत वर्दळीचा रस्ता. रस्त्यावर रांगेने महाविद्यालये, वसतीगृहे. विद्यार्थी, विद्यार्थिनींचा राबता. रस्त्यावरील गजबजलेला एक महत्त्वाचा चौक.चौकात रुग्णालये, मार्केट, हॉटेल, रिक्षास्टँड, बसथांबा. महिला-मुलींचा आणि अबालवृद्धांचा दिवसभर वावर. चौकातच पोलीस ठाणेही आणि पोलीस ठाण्यालगत भररस्त्यावर दिवसभर दारू पिणारे लोक.बिहारमध्ये शोभावा असा हा प्रकार आपल्या सुसंस्कृत अमरावती शहरात राजरोसपणे अनेक दिवसांपासून सुरू आहे. 'लोकमत'ने केलेल्या 'स्टिंग ऑपरेशन'मधून हे भयंकर वास्तव उघड झाले आहे.सीपी करणार का ठाणेदारावर कारवाई ?महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधन्य असेल, गुन्हेगारीचा दर आणि पोलिसांमध्ये बोकाळलेला भ्रष्टाचार मी कमी करेन, अशी घोषणा करणाऱ्या अमरावतीच्या नवनियुक्त पोलीस आयुक्त आरती सिंह 'लोकमत'ने उघड केलेल्या या जळजळीत पुराव्यांची दखल घेतील काय? पहिल्याच दिवशी नागरिकांना त्यांनी दिलेला शब्द त्या पाळतील काय? गाडगेनगर पोलीस ठाण्यालगत राजरोसपणे हे घडू देणाऱ्या ठाणेदारावर त्या कारवाई करतात की, काही कारणे सांगून बेकायदा वृत्तीला बळ देतात, याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले असेलच!गाडगेबाबांची समाधी हाकेच्या अंतरावर, यशोमती ठाकूर घेणार का दखल?दिवसभर आणि रात्रीही ज्या मुख्य मार्गावर दारू ढोसली जाते त्याच मार्गावर व्यसनमुक्तीची देशभर चळवळ राबविणाऱ्या गाडगेबाबांचे समाधीमंदीर आहे. जगविख्यात गाडगेबाबा मंदीरमार्गावर वावरणाऱ्या दारूड्यांमुळे, उघडपणे चालणाऱ्या दारूच्या गुत्त्यामुळे गाडगेबाबांच्या विचारांनी प्रेरित होऊन दूरदूरून येणारे अभ्यासक, भक्त, अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ते बुचकाळ्यातच पडतात. महिला सुरक्षेलाही धोका पोहोचला आहे. गाडगेबाबांच्या विचारांवर चालणाऱ्या जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर गंभीर दखल घेतील काय?

पोलीस ठाण्याच्या भिंतीवर दारूच्या बाटल्याशेगाव नाका चौकात हा प्रकार खुलेआम चालतो. त्याच चौकात गाडगेनगर पोलीसठाणे आहे. दारू पिणाऱ्यांना या ठाण्याच्या भिंतीचा मोठा उपयोग होतो. दारूच्या पावट्या, गार पाण्याच्या बाटल्या आणि डिस्पोजेबल ग्लासेस पोलीसठाण्याच्या भिंतीवर ठेवले जातात. दारू पिऊन झाल्यावरही बाटल्या भिंतीवरच असतात. बघूनही पोलीस आंधळे झाल्याने त्या मार्गावरून जा-ये करणाऱ्यांना आणि रहिवाशांना कायम असुरक्षिततेची भावना असते.

टॅग्स :liquor banदारूबंदीPoliceपोलिस