‘रेशन कार्डशी आधार कार्ड ३१ जानेवारीपर्यंत लिंक करा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:32 IST2021-01-13T04:32:18+5:302021-01-13T04:32:18+5:30
अचलपूर : तालुक्यातील सर्व रेशन कार्डधारकांनी आपल्या रेशन कार्डशी आधार कार्ड ३१ जानेवारीपर्यंत संलग्न करून घ्यावे, अन्यथा फेब्रुवारी महिन्यापासून ...

‘रेशन कार्डशी आधार कार्ड ३१ जानेवारीपर्यंत लिंक करा’
अचलपूर : तालुक्यातील सर्व रेशन कार्डधारकांनी आपल्या रेशन कार्डशी आधार कार्ड ३१ जानेवारीपर्यंत संलग्न करून घ्यावे, अन्यथा फेब्रुवारी महिन्यापासून अशा नागरिकांना रेशन दुकानातून रेशन मिळणार नाही, असा आदेश पुरवठा विभागाने काढला आहे.
अचलपूर तालुक्यात दोन लाखांच्या जवळपास नागरिक रेशन दुकानातून दरमहा गहू, तांदळाची अल्पदरात धान्य उचल करतात. तालुक्यातील ६० हजारांवर रेशन कार्ड ऑनलाईन करण्यात आले आहे. ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजनेंतर्गत ही योजना राबविण्यात येत असून, धान्याचा काळाबाजार या योजनेमुळे बंद होणार आहे.
मृत खातेधारक किंवा लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलीचे नावसुद्धा रेशन कार्डवर असतात. त्या धान्याची उचल सुरूच असते. मात्र, आता होणार नाही. ज्या नागरिकांचे आधार कार्ड लिंक असणार, त्यांना धान्य मिळणार आहे. ज्यांचे नाव पॉस मशीनवर आहे, पण त्यांच्या नावापुढे त्यांचा आधार क्रमांक लिंक नसेल, अशा लाभार्थींचा आधार क्रमांक पॉस मशीनवरच लिंक करण्याची सुविधा आहे. त्याचबरोबर प्रत्येक आर.सी. क्रमांकासोबत कुटुंबातील एका व्यक्तीचा मोबाईल क्रमांक लिंक करणेसुद्धा गरजेचे आहे.
नागरिकांनी आपले आधार कार्ड घेऊन रेशन दुकानदाराच्या पॉस मशीनवर लिंक करून घ्यावे, अन्यथा लिंक आधार नसलेल्या रेशन कार्डधारकांना फेब्रुवारीपासून धान्य मिळणार नाही.