शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

युरिया, डीएपीसोबत लिकिंगचा फंडा

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: May 07, 2024 11:40 PM

महिनाभरावर खरीप : नको असलेले जोडखत मारणार शेतकऱ्यांच्या माथी.

अमरावती : यंदाचा खरीप हंगाम महिनाभरावर आल्याने बाजारात बियाणे, खतांची तयारी सुरू झाली आहे. यावेळी युरिया, डीएपी १०:२६:२६ या रासायनिक खतांसोबत कंपन्यांनी विक्रेत्यांवर जोडखतांचा (लिकिंग) मारा सुरू केला आहे. पर्यायाने विक्रेत्यांद्वारा हे खत शेतकऱ्यांच्या माथी मारले जाण्याची शक्यता आहे.

हंगामाच्या सुरुवातीलाच रासायनिक खत कंपन्यांद्वारा युरिया, डीएपी व १०:२६:२६ या खतांसोबत २०:२०:०:१३ किंवा सल्फर या जोडखताचा पर्याय ठेवला आहे. १० टनासोबत ५ ते १० टन जोडखत दिले जात असल्याची माहिती एका कृषी केंद्रचालकाने दिली. या जोडखताला फारसा उठाव नसल्याने विकेत्यांद्वारा साठवणूक किंवा शेतकऱ्यांना विकावे लागणार आहे. त्यामुळे नको असलेले जोडखत पर्यायाने शेतकऱ्यांनाच विकले जाणार आहे. याबाबत कृषी विभागाशी संपर्क केला असता, लिकिंगबाबत अद्याप विक्रेत्यांची तक्रार प्राप्त नाही. याबाबत कंपन्यांना पत्र देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

यंदा ७ जूनला मृग नक्षत्र सुरू होत आहे. त्यापूर्वी रोहिणीमध्ये शेतकरी पेरणीपूर्वी मशागत करतात. जूनच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांची लगबग वाढते. यावर्षी पाऊस समाधानकारक राहणार असल्याचा अंदाज हवामानविषयक संस्थांनी दिलेला आहे. बियाणे बाजारात विक्रेत्यांची तयारी सुरू झाली आहे, शिवाय जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी खरीप हंगामपूर्व आढावा घेतलेला आहे.-----------------------हंगामात विक्रेत्यांना जोडखतांचा पर्याय देऊ नये, यासाठी संबंधित कंपन्यांना पत्र दिलेले आहे. शिवाय निविष्ठा विक्रेत्यांची बैठक घेऊन त्यांनीदेखील जोडखत शेतकऱ्यांना विकू नये, यासाठी सूचना केल्या आहेत.- राहुल सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी------------------------रासायनिक खतांची सद्यस्थिती (मे.टन)युरिया :१२,७९९एसएसपी : १२,४१६डीएपी : ६५७४एमओपी : २२५५संयुक्त खते : २६,६०६-----------------------सद्यस्थितीत ६०,६५० मे.टन साठा उपलब्ध१) यावर्षीच्या खरीप हंगामासाठी २,६३,२७० मे. टन रासायनिक खतांची मागणी आहे. त्यातुलनेत १,३८,४०० मे. टनाचे आवंटन आयुक्तालयाकडून मंजूर करण्यात आलेले आहे.२) रब्बी हंगामातील ५१,७२७ मे. टन खत मार्चअखेर शिल्लक आहे. दरम्यान, १५ एप्रिलपर्यंत ८,९२३ मे. टन खतांचा पुरवठा झाल्याने सद्यस्थितीत ६०,६५० मे. टन साठा उपलब्ध आहे.------------------------वेळेवर पुरवठा नसल्यास वाढणार शाॅर्टेजआयुक्तालयाने १,३८,४०० मे. टन रासायनिक खतांचे आवंटन मंजूर केलेले आहे. मात्र त्यातुलनेत पेरणीकाळात व त्यानंतर नियमित पुरवठा न झाल्यास युरिया, डीएपी, एमओपीसह अन्य खतांचा तुटवडा पडण्याची शक्यता आहे. यापूर्वीदेखील हा प्रकार झाला होता. त्यावेळी बफर स्टॉकमधून (संरक्षित साठा) पुरवठा करण्याला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली होती.

टॅग्स :Amravatiअमरावती