अधिकार्यांच्या वाहनांवर अद्यापही पिवळेच दिवे
By Admin | Updated: May 15, 2014 02:18 IST2014-05-15T02:18:40+5:302014-05-15T02:18:40+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शासकीय वाहनांवर फ्लॅशरविना निळा दिवा लावणे बंधनकारक केले असले तरी जिल्ह्यात ..

अधिकार्यांच्या वाहनांवर अद्यापही पिवळेच दिवे
अमरावती : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शासकीय वाहनांवर फ्लॅशरविना निळा दिवा लावणे बंधनकारक केले असले तरी जिल्ह्यात जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व पोलीस विभागाच्या काही वाहनांवर अद्याप अंबर दिवाच दिसून येत आहे.यावर आरटीओंनी अद्यापही कारवाई केलेली नाही. निळा दिवा उपलब्ध नसल्यास सध्याचा दिवा झाकून टाकणे किंवा तो काढून टाकणे आवश्यक असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
प्रशासकीय अधिकार्यांच्या वाहनांवर अंबर दिवा लावण्यात येत होता. सरकारी वाहनांवरील दिव्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने याचिका दाखल झाली होती.मागील वर्षी १0 डिसेंबर रोजी त्यासंदर्भात निकाल लागला. त्यानुसार आता अंबर दिव्याऐवजी फ्लॅशरविना निळा दिवा लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार कायद्याचा भंग करणार्या सरकारी अधिकार्यांवर कारवाईची तरतूद करण्यात आलेली आहे.यासंदर्भात शासनाकडून अधिसूचना जारी केली आहे. त्यानंतर एप्रिल महिन्यात प्रादेशिक परिवहन विभागाने दिवा बदलविण्यासंदर्भात पत्र अधिकार्यांना दिले होते. त्यानुसार महसूल, पोलीस, जिल्हा परिषद, वन विभाग, महापालिका व अन्य विभागांना अंमलबजावणीसाठी निर्देश दिले आहेत. अधिकार्यांनी वाहनांवरील दिवा बदलविला नाही. निळा दिव्याची मागणी परिवहन सेवा व मोटार परिवहन विभागाकडे करायची आहे. (प्रतिनिधी)