३० आॅगस्टपर्यंत हलका, मध्यम पाऊस पडणार
By Admin | Updated: August 28, 2016 00:02 IST2016-08-28T00:02:45+5:302016-08-28T00:02:45+5:30
पावसाने अतिवृष्टीचे संकट निर्माण झाले होते. मात्र, ७ आॅगस्टनंतर दांडी मारल्यामुळे असह्य उकाडा निर्माण झाला आहे.

३० आॅगस्टपर्यंत हलका, मध्यम पाऊस पडणार
अंदाज : २१ दिवसांपासून पावसाची दडी
अमरावती : पावसाने अतिवृष्टीचे संकट निर्माण झाले होते. मात्र, ७ आॅगस्टनंतर दांडी मारल्यामुळे असह्य उकाडा निर्माण झाला आहे. आता पुन्हा हलका व मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांच्या मते, आंध्रप्रदेश किनारपट्टीवर व पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र आणि ८ किमी. उंचीवर चक्राकार वारे आहे. तसेच बंगालच्या उपसागरावर ९०० मिटर उंचीवर चक्राकार वारे आहेत. दक्षिण राजस्थानवर आणि मध्यप्रदेशावरही चक्राकार वारे असून कर्नाटक किनार पट्टीवर ते केरळ कमजोर द्रोणीय स्थिती आहे. कमी दाबाचे क्षेत्र हे दक्षिणेकडून पश्चिमेकडे सरकत आहे. या स्थितीमुळे २८ आॅगस्टला बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम, २९ आणि ३० आॅगस्टला बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य भारतात २ सप्टेंबरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुन्हा पावसाची वातारवण तयार होत असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे. हवामान तज्ज्ञांने शनिवारी बऱ्याच ठिकाणी हलका किंवा मध्यम पावसाची शक्यता वर्तविली आहे. (प्रतिनिधी)
हवेतील आर्द्रतेमुळे उकाळा
पाऊस ओसरल्यानंतर उन्हाचा तडाखा सुरु झाला. त्यातच वातावरण हवेचे प्रमाण कमी झाले. तापत्या उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन वाढले. त्यामुळे हवेत आर्द्रता वाढली आहे. या आर्द्रतेमुळे गर्मी वाढल्याने उकाळा निर्माण झाला आहे. हा उकाळा आता असह्य होऊ लागला असून अनेकांनी तर थंड हवेकरिता कुलर सुध्दा काढल्याचे चित्र शहरात आढळून आले आहे.