९० फूट उंचीवर मांजात अडकलेल्या घारीला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 23:34 IST2017-12-14T23:33:17+5:302017-12-14T23:34:25+5:30

नायलॉन मांजात अडकलेल्या घारीला ९० फूट उंचीवरून खाली उतरवून वसा संस्थेने जीवनदान दिले. राजापेठ पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस असलेल्या एका पिंपळाच्या झाडावर ही घार मरणाशी झुंज देत होती.

Lifting the stuck at the height of 90 feet | ९० फूट उंचीवर मांजात अडकलेल्या घारीला जीवदान

९० फूट उंचीवर मांजात अडकलेल्या घारीला जीवदान

ठळक मुद्देतीन तास चालले रेस्क्यू आॅपरेशन : वसा संस्थेचे पक्षीप्रेम

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नायलॉन मांजात अडकलेल्या घारीला ९० फूट उंचीवरून खाली उतरवून वसा संस्थेने जीवनदान दिले. राजापेठ पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस असलेल्या एका पिंपळाच्या झाडावर ही घार मरणाशी झुंज देत होती. पक्षिप्रेमींनी जिवाची पर्वा न करता तीन तास अथक परिश्रम घेऊन तिची झुंज यशस्वी केली.
पिंपळाच्या सर्वात वरच्या टोकावर मांज्यात एक घार अडकून तडफडत असल्याचे वसा संस्थेच्या काही सदस्यांच्या लक्षात आले होते. या पक्ष्याचे प्राण कसे वाचवावे, यासाठी मंथन झाल्यानंतर वसा संस्थेने अग्निशमन दलाची मदत घेण्याचा निर्णय घेतला. वसा समूह व अग्निशमन दलाचे जवान गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास पिंपळाच्या झाडाजवळ पोहोचले. अग्निशमनजवळील शिडीने पक्षिपे्रमी पिंपळाच्या झाडावर चढले. त्यांतर दोरखंडाचा वापर करून ते घारीपर्यंत पोहोचले. तिला अलगद मांज्यातून सोडविल्यानंतर उपचार सुरू झाले.
पंखात मांजा अडकल्याने घार जखमी झाली होती. तब्बल तीन तास हे रेस्क्यू आॅपरेशन चालले. वसा संस्थेचे पदाधिकारी संकटात सापडलेल्या पक्ष्यांवर लक्ष ठेवूनच असतात. वर्षभरात २० ते २५ पक्ष्यांवर उपचार केले जातात. मकर संक्रांतीच्या काळात पंतगी उडविण्याचे प्रकार चालतात. अशाप्रसंगी पंतगीच्या मांज्यात अडकून अनेक पक्षी जखमी होतात. त्यावेळी वसाचे पक्षिप्रेमी लगेच घेऊन जातात. नायलॉन मांजा पक्षासोबत मानवालाही धोका ठरत आहे. अनेकदा मांजात अडकून नागरिक जखमी सुध्दा झाले आहेत. गुरुवारी झाडावरील मांजात अडकलेल्या घारीला वाचविण्यासाठी वसाचे अवी पुंजलवाल, सूरज डोळस, गणेश अकर्ते, ज्ञानेश्वर पात्रोकर, शुभम सायंके, अग्निशमनचे अमित ददगाळ, अतुल कपले, राजेश गजबे, फायरमन चालक नितीन इंगोले यांनी अथक परिश्रम घेतले. नॉयलॉनच्या मांजावर बंदी असताना शहरात छुप्या मार्गाने आजही या मांजाची विक्री सुरू आहे. हा मांजा जीवघेणा ठरत असून मांजा विक्री, उत्पादन किंवा साठवण करणे गुन्हा ठरते. पोलीस विभागाकडून नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात यावा, अशी मागणी पक्षिप्रेमींकडून होत आहे.

Web Title: Lifting the stuck at the height of 90 feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.