दुरूस्तीदरम्यान लिफ्ट कोसळली, कामगाराचा मृृत्यू
By Admin | Updated: July 4, 2015 00:44 IST2015-07-04T00:44:14+5:302015-07-04T00:44:14+5:30
तिसऱ्या मजल्यावरील लिफ्ट अंगावर पडल्याने कमगाराचा मृत्यू झाला.

दुरूस्तीदरम्यान लिफ्ट कोसळली, कामगाराचा मृृत्यू
अमरावती : तिसऱ्या मजल्यावरील लिफ्ट अंगावर पडल्याने कमगाराचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास गाडगेनगर पोलीस ठाण्यांतर्गत मांगीलाल प्लॉट परिसरात घडली. संजय पांडुरंग मोहुरले (२२, रा. सुसुन, वर्धा) असे मृताचे नाव आहे.
मांगिलाल प्लॉट येथे चार मजल्यांचे ‘जय गजानन’ अपार्टमेंट असून तेथील लिफ्टचे काम सुरु आहे. लिफ्ट बसविण्याचे कार्य नागपूर येथील कंत्राटदार इमरान शेख यांच्याकडे आहे. हे काम सुरू असताना हा अपघात घडला.