लाईफलाईन ओरिएंटलला सील

By Admin | Updated: December 16, 2015 00:18 IST2015-12-16T00:15:47+5:302015-12-16T00:18:47+5:30

आकर्षक कमिशन आणि गुंतवणुकीवर आकर्षक परतावाचे प्रलोभन दाखवून ग्राहकांना लुबाडण्याचा आरोप असलेल्या लाईफलाईन ओरिएन्टल ट्रेडलिंक्स लिमिटेडच्या...

Lifeline Oriental Seal | लाईफलाईन ओरिएंटलला सील

लाईफलाईन ओरिएंटलला सील

दोन संचालक ताब्यात : संगणकासह दस्तऐवज जप्त
अमरावती : आकर्षक कमिशन आणि गुंतवणुकीवर आकर्षक परतावाचे प्रलोभन दाखवून ग्राहकांना लुबाडण्याचा आरोप असलेल्या लाईफलाईन ओरिएन्टल ट्रेडलिंक्स लिमिटेडच्या स्थानिक कार्यालयाला मंगळवारी सायंकाळी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सील ठोकले. याप्रकरणी कंपनीच्या नाशिक येथील संचालकासह स्थानिक संचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या कार्यालयातून संगणकासह महत्त्वपूर्ण दस्तऐवज पोलिसांनी जप्त केला.
उल्लेखनीय म्हणजे माध्यमांसमोर आपली बाजू मांडण्यासाठी अमरावतीत आलेले नाशिक येथील संचालक एस.बी. शिरोडे हे अलगदच पोलिसांच्या जाळ्यात अडकले. याशिवाय सुरेश राऊत (रा. कॅम्प, अमरावती) यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी भादंविच्या कलम ४६७, ४६८, ४७१, ४२० आणि चिटफंड मनी सर्क्युलेशन अ‍ॅक्टच्या ३,५,६, अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान मंगळवारी सायंकाळई ७ वाजताच्या सुमारास शहर कोतवालीचे ठाणेदार दिलीप पाटील यांच्या उपस्थितीत गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक कांचन पांडे व त्यांच्या पथकाने खापर्डे बगिच्या स्थित मोरेश्वर प्लॉझामधील लाईफलाईन ओरिएन्टल ट्रेडलिंक्स लिमिडेटच्या कार्यालयामध्ये धाड टाकली. सुरेश राऊत हा या कंपनीचा मास्टर मार्इंड असल्याची माहिती उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी दिली. अधिक सदस्य बनवून कमिशन देण्याची बतावणी करून शहरात कंपनीने एक हजारापेक्षा अधिक ग्राहकांकडून प्रत्येकी २ हजार २०० रुपये उकळले. मात्र, त्यानंतर परताव्याची रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याने काही महिला ग्राहकांनी तक्रार केली आहे.

Web Title: Lifeline Oriental Seal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.