बंजर माटी में मृत्यू से जीवन खिंचा है!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 00:05 IST2021-03-25T05:00:00+5:302021-03-25T00:05:02+5:30
आरोग्य अधिकारी, कर्मचारी, गटप्रवर्तिका अर्थात आशा या कोरोनायोद्ध्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात डॉ. दिलीप रणमले यांनी या सर्वांच्या आतापर्यंतच्या अविरत श्रमाबद्दल आदर व्यक्त केला आहे. रुग्णसेवेहून दुसरे मोठे कार्य नाही. सैन्य जसे सीमेवर लढून देशाचे रक्षण करते, तसे आपण समाजातील अर्भकापासून वृद्धांपर्यंत सर्वांच्या प्राणांचे संरक्षण करण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून लढत आहात, अशा शब्दांत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आरोग्य कर्मचारी व आशाताईंचा गौरव केला आहे.

बंजर माटी में मृत्यू से जीवन खिंचा है!
लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर/ येवदा : आपण सुरुवातीपासून कोविड-१९ शी लढाईत सर्वांत पुढच्या आघाडीवर होतो. आज पुन्हा रुग्णसंख्येत वाढ दिसून येताना, ही लढाई निकराने व शर्थीने लढणे गरजेचे वाटू लागले आहे. सर्वांच्या प्रयत्नांतून एक दिवस या महामारीवर निश्चित मात करू, असा विश्वास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना पत्र लिहून व्यक्त केला आहे.
आरोग्य अधिकारी, कर्मचारी, गटप्रवर्तिका अर्थात आशा या कोरोनायोद्ध्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात डॉ. दिलीप रणमले यांनी या सर्वांच्या आतापर्यंतच्या अविरत श्रमाबद्दल आदर व्यक्त केला आहे. रुग्णसेवेहून दुसरे मोठे कार्य नाही. सैन्य जसे सीमेवर लढून देशाचे रक्षण करते, तसे आपण समाजातील अर्भकापासून वृद्धांपर्यंत सर्वांच्या प्राणांचे संरक्षण करण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून लढत आहात, अशा शब्दांत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आरोग्य कर्मचारी व आशाताईंचा गौरव केला आहे. बाधितांची वाढती संख्या पाहता, आपली जबाबदारी आणखी वाढली आहे. त्यामुळे ही लढाई शर्थीने लढणे आवश्यक झाले आहे.
प्रत्येक जण आपल्याकडे आशेचा किरण म्हणून पाहतो आहे. त्यामुळे त्यांच्या निरोगी जीवनासाठी त्यांच्या मनावर दक्षता त्रिसूत्री बिंबवणे, जीवनशैलीचा भाग होण्यासाठी ती सतत सांगत राहणे आवश्यक आहे. कोरोनाची लक्षणे आढळलेल्या व्यक्तींना तपासणीसाठी पाठविणे आणि पॉझिटिव्ह आलेल्यांना उपचार मिळवून देत संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या करवून घेण्यासाठी तालुका कार्यालयांना वेळोवेळी माहिती देणे आवश्यक आहे. हे काम ‘आशाताईं’ कडून नियमितपणे होत असल्याने त्यांचा या लढाईतील योगदान मोलाचे आहे. पुढील लढाईही आम्ही शर्थीने आणि एकजुटीने लढू व एक दिवस कोरोनावर निश्चित मात करू, असा विश्वास देत डॉ. रणमले यांनी लिखित पत्रातून आरोग्य कर्मचाऱ्यांना आवाहन केले आहे.
असे केले आवाहन
‘हम उस माटी के वृक्ष नही, जिसको नदीयों ने सिंचा है, बंजर माटी में पलकर भी हमने मृत्यू से जीवन खिंचा है, मिटनेवाला नाम नही हमारा, एक दिन जरूर महामारीसे जितेंगे’, असा निर्धार व्यक्त करीत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी या सर्वांना कोरोना लढाईत एकजुटीने लढण्याचे आवाहन केले आहे.