ग्रंथालयाच्या अनुदानात झाली ४० टक्के घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:14 IST2021-02-13T04:14:26+5:302021-02-13T04:14:26+5:30
क आणि ड दर्जा ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांवर संकटवेळ, पुस्तक खरेदीवरही परिणाम अमरावती : बदलती वाचन संस्कृती ग्रंथालयांना तुटपुंजे अनुदान ...

ग्रंथालयाच्या अनुदानात झाली ४० टक्के घट
क आणि ड दर्जा ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांवर संकटवेळ, पुस्तक खरेदीवरही परिणाम
अमरावती : बदलती वाचन संस्कृती ग्रंथालयांना तुटपुंजे अनुदान यामुळे ग्रंथालयाच्या स्थितीवर परिणाम होतो आहे. यंदा कोरोनामुळे तर राज्य शासनाकडून ग्रंथालयांना देण्यात येणाऱ्या ४० टक्के निधी अद्याप प्राप्त झाला नसल्याने ग्रंथालयाची वाट बिकट झाली आहे.
जिल्ह्यात ३९९ ग्रंथालयांना ६० टक्के अनुदान मिळाले आहे. त्यामुळे या ग्रंथालयांना वेळेवर उर्वरित ४० टक्के निधी उपलब्ध न झाल्याने त्याचा परिणाम ग्रंथालयाच्या पुस्तक खरेदी व तसेच क आणि ड दर्जाच्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीचे संकट आले आहे. अनुदानात ४० टक्क्यांनी घट झाली आहे. अशातच कोरोना काळात घटलेली वाचन संख्या आता मात्र परीक्षांचा कालावधी तोंडावर आल्यामुळे बरीच वाढल्याचे येथील ग्रंथालयात निरीक्षण दरम्यान दिसून आले. वाचन संस्कृती वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथालय प्रशासनाचा प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्यातील एकूण ३९९ ग्रंथालय आहेत. मिळालेल्या ६० टक्के अनुदानात कर्मचाऱ्यांचे पगार द्यायची की नवीन पुस्तक खरेदी करायची अशी मनस्थिती ग्रंथालयांची झाली आहे.
बॉक्स
ग्रंथालयाची संख्या व दर्जा कर्मचारी संख्या
अ वर्ग ०९ ३८
ब वर्ग ८९ २६७
क वर्ग १४८ २९६
ड वर्ग १५३ १५३
एकूण ३९९ ७५४
कोट
ग्रंथालयांना शासनाकडून मिळणारे अनुदान तसेच वाचक वर्गही ग्रंथालयाची दोन चाके आहेत त्यातील एक चाक आले तरी ग्रंथालयाची आर्थिक घडी बिघडते यंदा कोरोनामुळे शासनाच्या अनुदानाला ही विलंब झाला आहे तसेच कोरोनामुळे सध्यातरी वाचकांची संख्या रोडावली आहे वाचन चळवळ पुन्हा पूर्ववत करण्यासाठी लोकाश्रय आणि राजाश्रय दोन्हींच्या मदतीची गरज आहे
चंद्रकांत चांगदे
अध्यक्ष जिल्हा ग्रंथालय संघटना