कर आकारणीवरील स्थगिती उठविली

By Admin | Updated: January 8, 2016 00:24 IST2016-01-08T00:24:24+5:302016-01-08T00:24:24+5:30

ग्रामपंचायत कर आकारणीतील बदल आणि न्यायालयाच्या स्थगितीमुळे जिल्ह्यातील ग्राम पंचायतीची मागील नऊ महिन्यांत एक रुपयाही करवसुली झालेली नाही.

The levy on taxation was raised | कर आकारणीवरील स्थगिती उठविली

कर आकारणीवरील स्थगिती उठविली

जितेंद्र दखने अमरावती
ग्रामपंचायत कर आकारणीतील बदल आणि न्यायालयाच्या स्थगितीमुळे जिल्ह्यातील ग्राम पंचायतीची मागील नऊ महिन्यांत एक रुपयाही करवसुली झालेली नाही. राज्य शासनाने इमारतीच्या क्षेत्रफळावरील आकारणी रद्द करून नव्याने भांडवली मूल्यावर आकारणी निश्चित केली आहे.
निर्णयांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली स्थगितरी उठविण्यात आली आहे. या बाबतचा आदेश ग्राम विकास विभागाचे उपसचिव संजय बनकर यांनी २ जानेवारीला काढला. या निर्णयामुळे एप्रिल २०१५ पासून थांबलेल्या कर वसूलीला पुन्हा सुरुवात होणार आहे. शासनाच्या नवीन धोरणाप्रमाणे क्षेत्रफळाऐवजी आता भांडवली मूल्यावर कर आकारणी असेल. भांडवली मूल्यावर कर आकारणी करताना शासनाने सुरुवातीच्या काळात ती सध्याच्या काही पटीने म्हणजे सहा ते बारा वर वाढविण्यात येणार असल्याचा आराखडा प्रसिद्ध केला होता. त्यानंतरच्या सुधारित आराखड्यात कर आकारणी फक्त दुप्पट ते चारपट होणार असल्याचे स्पष्ट झाले होते.
शासनाने २ जानवोरी २०१६ रोजी आदेश काढून नेमकी किती आकारणी होणार हे त्यात स्पष्ट केले होते. भांडवली मूल्यावर आकारणी करताना इमारतीच्या घसारा या किमतीतून वजा करण्यात येणार आहे. त्या समितीची मार्गदर्शक तत्त्वेही जाहीर करण्यात आली आहे.
इमारतीचे भांडवली मूल्य काढताना इमारतीचे क्षेत्रफळ, जमिनीचे वार्षिक मूल्यदर, इमारतीच्या प्रकारानुसार आकारणी, घसारा, इमारतीचा घरगुती, व्यावसायिक आणि वाणिज्य वापरासाठीचे निर्देशांत गृहित धरण्यात येणार आहेत.

Web Title: The levy on taxation was raised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.