चला... चिमण्यांना वाचवू या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:49 AM2018-03-20T00:49:53+5:302018-03-20T00:49:53+5:30

मोबाइल अन् संगणक युगात पहाटे चिवचिवाटाने जागे करणाऱ्या चिमण्या कालबाह्य झाल्यागत आहे.

Let's save the sparrows! | चला... चिमण्यांना वाचवू या!

चला... चिमण्यांना वाचवू या!

googlenewsNext

इंदल चव्हाण ।
आॅनलाईन लोकमत
अमरावती : मोबाइल अन् संगणक युगात पहाटे चिवचिवाटाने जागे करणाऱ्या चिमण्या कालबाह्य झाल्यागत आहे. चहुबाजूला काँक्रीटीकरण झाल्यामुळे चिमण्यांचे वास्तव्य संपुष्टात आले असले तरी टीटीनगर मात्र त्याला अपवाद ठरले आहे. आजही येथील नागरिकांची पहाट पक्ष्यांच्या चिवचिवाटाने उजाडते. पक्ष्यांना जगण्याच्या दृष्टिकोनातून वातावरणाची निर्मिती करायची आहे, ज्यामुळे पक्ष्यांची संख्या वाढीस मदत होणार आहे.
स्थानिक अभियंता कॉलनी परिसरातील टीटीनगरात पक्षिमित्र वैभव ठाकरे हे पक्ष्यांना रोज खाद्य व पाणी पुरविण्याचे कार्य करतात. येथे पक्ष्यांना पोषक वातावरण निर्मित होत असल्याने त्यांच्या घरासमोरील कडुनिंब, काटेरी झाडांवर व तारेवर पक्ष्यांचे थवे दिसून येतात. त्यांच्या प्रेरणेने परिसरातील नागरिकांनाही पक्ष्यांबद्दल आकर्षण वाढत असल्याने ठिकठिकाणी पाण्याची भांडी, घरटी ठेवली जातात. या परिसरात चिमण्यांचा वावर दिसून येतो.
पर्यावरण संतुलनात पक्ष्यांची भूमिका महत्त्वाची
मानवाच्या स्वार्थापोटी जंगलाचा ऱ्हास होऊन पर्यावरणात बदल झाले आहे. सुप्रसिद्ध भौतिकशास्त्राचे तज्ज्ञ आइनस्टाइन यांनी संशोधनात मांडल्याप्रमाणे, पाणी आहे म्हणून झाडं नव्हेत, तर झाडं आहेत म्हणून पाणी आहे. पक्ष्यांनाही वृक्षांची गरज असते, तर पर्यावरण संतुलानासाठी पक्षी संवर्धन आवश्यक आहे. त्यामुळे यातील साम्य अनिवार्य आहे.
सर्वांनी दाखवावी भूतदया
प्रत्येक सूक्ष्म जीवही अन्नसाखळीतील घटक असल्याने त्यांचे अस्तीत्व अबाधित राखण्याचे कार्य माणसांना करावयाचे आहे. त्यामुळे सर्वांनी भूतदया दाखवित चिमण्यांचा बचाव करणे आवश्यक आहे.

प्रत्येक नागरिकाने घरोघरी दाणा-पाण्याची सुविधा केल्यास पक्ष्यांना या दिवसांत आधार मिळेल. पक्षी वाचविणे काळाची गरज समजून प्रत्येकांनी या कार्यात सहभागी होणे गरजेचे आहे.
- वैभव ठाकरे, पक्षिमित्र

Web Title: Let's save the sparrows!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.