चला जोडूया रक्ताची नाती...
By Admin | Updated: July 2, 2015 00:14 IST2015-07-02T00:14:04+5:302015-07-02T00:14:04+5:30
रक्तदान हे श्रेष्ठ दान मानले जाते. म्हणूनच ही रक्ताची नाती जोडण्यासाठी ‘लोकमत’ व ‘युवा आॅर्गनायझेशन’तर्फे उद्या, गुरुवारी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

चला जोडूया रक्ताची नाती...
रक्तदान शिबिर : लोकमतचा उपक्रम
अमरावती : रक्तदान हे श्रेष्ठ दान मानले जाते. म्हणूनच ही रक्ताची नाती जोडण्यासाठी ‘लोकमत’ व ‘युवा आॅर्गनायझेशन’तर्फे उद्या, गुरुवारी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
‘लोकमत’ चे संस्थापक -संपादक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या ९२ व्या जयंतीचे औचित्य साधून लोकमत भवन, विभागीय क्रिडा संकूल, मोर्शी रोड, अमरावती येथे सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत हे शिबिर होईल. यामध्ये युनिक अकादमी, प्रहार संघटना व युवा नेक्स्टचे सहकार्य लाभणार आहे. आपल्या रक्ताचा एक थेंब एखाद्याचे प्राण वाचवू शकतो, म्हणूनच या रक्तदान शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आले आहे.