दुकाने उघडू द्या, अन्यथा पालनपोषण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:13 IST2021-04-08T04:13:02+5:302021-04-08T04:13:02+5:30
कोरोना उठला जिवावर, तहसीलदारांना नाभिक दुकानदारांची मागणीजरूड-वरूड : राज्य शासनाने सलून व पार्लर व्यवसाय ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय ...

दुकाने उघडू द्या, अन्यथा पालनपोषण करा
कोरोना उठला जिवावर, तहसीलदारांना नाभिक दुकानदारांची मागणीजरूड-वरूड : राज्य शासनाने सलून व पार्लर व्यवसाय ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्व सलुन व्यावसाय करणाऱ्या बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहेक्त्यामुळे दुकाने उघडू द्यावी किंवा राज्य शासनाने पालनपोषणाची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी शहरातील नाभिक व्यावसायिकांनी तहसीलदारांकडे निवेदनातून केली.
सन २०२० मधील लॉकडाऊनमध्ये सलून कामावर अवलंबुन असलेल्या १७ नाभिक बांधवांनी आत्महत्या केल्या. अजूनपर्यंत या कुटुबांला शासनाकडून मदत मिळाली नाही, उलट त्यांचा वीजपुरवठा कापून त्यांना अंधारात ढकलण्यात आले. नाभिक व्यवसायातील कुटुंबाची अत्यंत हलाखीची परिस्थिती असताना, आता शासनाने पुन्हा लॉकडाऊन लावण्याचा आदेश काढला. यामुळे महाराष्ट्र नाभिक महामंडळ व वरूड नाभिक दुकानदार यांच्यावतीने शासनाच्या या निर्णयाची होळी करण्याचा मनोदय नाभिक संघटनेने व्यक्त केला.
निवेदन देताना तालुकाध्यक्ष रामकृष्ण शिरूळकर, नाभिक महामंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण सावरकर, तालुका युवा अध्यक्ष रूपेश निंभोरकर, रमेश माथूरकर, भालचंद्र चौधरी, रीतेश धानोरकर, राजू मिसळकर, लीलाधर आजनकर, रमेश आसोलकर, दिलीप बाभूळकर, दीपक पापडकर, अशोक साखरकर, राजिव बाभूळकर उपस्थित होते.