वऱ्हाडातील सुगंध मुंबईत दरवळतोू
By Admin | Updated: December 30, 2014 23:25 IST2014-12-30T23:25:51+5:302014-12-30T23:25:51+5:30
आपल्या अस्सल मराठी व विशेषत: वऱ्हाडातील भाषाशैलीमुळे मराठी रसिकांच्या हृदयात घर केलेला व ‘फु बाई फु’ व ‘चला हवा येवू द्या’ या छोट्या पडद्यावरून घराघरात लोकप्रिय ठरलेला मराठी अभिनेता

वऱ्हाडातील सुगंध मुंबईत दरवळतोू
संदीप मानकर -दर्यापूर
आपल्या अस्सल मराठी व विशेषत: वऱ्हाडातील भाषाशैलीमुळे मराठी रसिकांच्या हृदयात घर केलेला व ‘फु बाई फु’ व ‘चला हवा येवू द्या’ या छोट्या पडद्यावरून घराघरात लोकप्रिय ठरलेला मराठी अभिनेता भरत गणेशपूरे म्हणतो, दर्यापूर, अमरावती, विशेषत: वऱ्हाडातील मातीचा सुगंध हा मुंबईत दरवळतो आहे. मराठी भाषेचा सन्मान म्हणून प्रत्येक मराठी माणसाने मराठी चित्रपट पाहावे असे मत मराठी महाअभिनेता भरत गणेशपूरे यांनी व्यक्त केले.
दर्यापूर येथे आयोजित ‘आई’ महोत्सवासाठी भरत गणेशपूरे यांचे आगमन बुधवारी सकाळी ६ वाजता विदर्भ एक्सप्रेसने मुर्तिजापूरला झाले. सकाळी ८ वाजता ते दर्यापूर विश्रामगृह येथे थांबले असता त्यांनी ‘लोकमत’च्या प्रतिनिधींशी दिलखुुलास गप्पा केल्या. ते म्हणाले , माझा जन्म दर्यापूरच्या मातीत झाला बालपणी तीसरी व चौथीपर्यंत शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर न. प. शाळा (टेकडी शाळेत) झाले. नंतर ५ ते ६ पर्यंत येथील प्रबोधन विद्यालयात शिकलो. वडील नोकरीत असल्यामुळे पुढील शिक्षण परतवाडा आणि नंतरचे शिक्षण अमरावतीला झाले. अभिनयाची आवड असल्यामुळे परतवाड्यात तीन अंकी नाटक व दर्यापूरला एकदा शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला होता. राज्यभर अनेक नाटके केली. गेल्या १५ वर्षांपासून मराठी चित्रपट सृष्टीत आपण कार्यरत असून आतापर्यंत ३० ते ३५ चित्रपटात भूमिका करण्याची संधी मिळाली. पण महाराष्ट्राच्या रसिकांच्या हृदयात खरी ओळख ‘फु बाई फु’ व ‘चला हवा येवू द्या’ या विनोदी व हास्यसम्राट नाटिकेतून झाली. सध्या एका वाहिनीवर हे दोन्ही प्रोग्राम यशस्वी ठरले. त्यांनी ४.५ एवढा टि. आर. पी. मिळविला आहे. आपले महत्वाचे व आठवणीतील कुठल्या चित्रपटांमध्ये आपण भूमिका साकारली असे विचारले असता भरत गणेशपूरे हसून म्हणतात, माझ्या करिअरच्या दृष्टीकोणातून मला सर्वच चित्रपट महत्वाचे वाटतात. त्यापैकी निशानी, डावा अंगठा, एक डाव, धोबी पछाड, प्रकाश बाबा आमटे, अश्या चित्रपटात भूमिका करताना मजा वाटली तर आक्रोश, ब्लॅक फ्रॉ डे, एक चाली की लॉस्ट लोकल अश्या हिंदी चित्रपटातही आवाहनात्मक भूमिका पार पाडल्या असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी ‘आई’ महोत्सवांचे कौतुक केले व दर्यापुरात येऊन दर्यापूरच्या मातीचे ऋण फेडण्याची मला संधी मिळाल्याचे त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी गाडगेबाबा मंडळाचे अध्यक्ष गजानन भारसाकळे व गणेश रामेकर उपस्थित होते.