आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण सेतुद्वारे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:11 IST2021-05-29T04:11:16+5:302021-05-29T04:11:16+5:30

अमरावती : विद्यमान शैक्षणिक सत्रात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना ग्रामस्तरावर शैक्षणिक साहित्य, शालेय पोषण आहाराचा पुरवठा तसेच शिकवणी ...

Lessons for the students of the Ashram School through the Education Bridge | आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण सेतुद्वारे धडे

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण सेतुद्वारे धडे

अमरावती : विद्यमान शैक्षणिक सत्रात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना ग्रामस्तरावर शैक्षणिक साहित्य, शालेय पोषण आहाराचा पुरवठा तसेच शिकवणी वर्गाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षण सेतु अभियान राबविण्याचे निर्देश आदिवासी विकास विभागाने २४ मे रोजी जारी केले आहेत.

कोरोना संसर्गामुळे ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय खुला झाला असला तरी दुर्गम, अतिदुर्गम व डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांना मोबाईल कनेक्टिव्हिटीअभावी त्यापासून वंचित राहावे लागल्याचे समोर आले आहे. शासकीय आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये निवासी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. बहुतांश विद्यार्थी त्यांच्या गावी परत गेले आहेत. चालू शैक्षणिक सत्रात आदिवासी विद्यार्थ्यी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये, या उद्देशातून राज्य शासनाने शिक्षण सेतु अभियान राबविण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाची ऑनलाईन सुविधा उपलब्ध केली जाईल. ते शक्य नसल्यास गावस्तरावर जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जातील. शैक्षणिक साहित्य उपलब्ध केले जाईल. शालेय पोषण आहाराचा पुरवठा होईल. याशिवाय बँक खात्यात डीबीटीनुसार पैसे जमा करण्याचाही समावेश करण्यात आला आहे.

बॉक्स

शासनाचा ‘वॉच’

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कायम असेपर्यंत आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण सेतु अभियान राबविण्याच्या स्पष्ट सूचना आहेत. या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा व शालेय पोषण आहाराचा पुरवठा केला जातो किंवा नाही, यावर शासनाचा ‘वॉच’ राहणार आहे.

Web Title: Lessons for the students of the Ashram School through the Education Bridge