बिबट्याने केली नीलगाईची शिकार
By Admin | Updated: June 27, 2015 00:23 IST2015-06-27T00:23:00+5:302015-06-27T00:23:00+5:30
बिबट्याने मार्डी मार्गावरील इंडो पब्लिक स्कूलच्या मागच्या आवारात नीलगाईची शिकार केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.

बिबट्याने केली नीलगाईची शिकार
मार्डी मार्गाजवळील घटना : भानखेडा शेतशिवारातून नेला कुत्रा उचलून
अमरावती : बिबट्याने मार्डी मार्गावरील इंडो पब्लिक स्कूलच्या मागच्या आवारात नीलगाईची शिकार केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. तसेच भानखेडा येथील एका शेतशिवारातून बिबट्याने एका कुत्र्यालाही उचलून नेले. वनविभागाच्या शिकारी प्रतिबंधक विभागाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
इंडो पब्लिक स्कूलच्या मागच्या बाजूला बिबट्याने नीलगाईची शिकार केल्याची माहिती वनविभागाला मिळाली. लगेच शिकार प्रतिबंधक पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी डब्ल्यू.डी. शेख, अमोल गावनेर फिरोज खान, मनोज ठाकूर, सतीश उमक, अमीत शिंदे व चंदू ढवळे यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. त्याचप्रमाणे भानखेडा येथील रहिवासी सचिन राठोड यांच्या शेतशिवारात बिबट्याने कुत्र्यांची शिकार केली. या ठिकाणी भेट देऊन या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. (प्रतिनिधी)
वनविभागने लावला टॅ्रप कॅमेरा
शिकारी प्रतिबंधक पथकाने शिकार झालेल्या नीलगाईची पाहणी केल्यावर बिबट्यानेच शिकार केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नीलगाईला खाण्यासाठी पुन्हा बिबट येऊ शकतो, ही शक्यता लक्षात घेता शिकार प्रतिबंधक पथकाने ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. तसेच सुरक्षिततेचे उपायदेखील करण्यात आले आहे.