गुंजी परिसरात बिबट्याचा वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:16 IST2021-09-06T04:16:38+5:302021-09-06T04:16:38+5:30

ग्रामस्थांना झाले सकाळी दर्शन धामणगाव रेल्वे : तालुक्यात काही दिवसांपासून नदीकाठी व आता गुंजी गावाच्या परिसरात बिबट्याचा वावर ...

Leopard roaming in Gunji area | गुंजी परिसरात बिबट्याचा वावर

गुंजी परिसरात बिबट्याचा वावर

ग्रामस्थांना झाले सकाळी दर्शन

धामणगाव रेल्वे : तालुक्यात काही दिवसांपासून नदीकाठी व आता गुंजी गावाच्या परिसरात बिबट्याचा वावर असून रविवारी पहाटे ग्रामस्थांना या बिबट्याचे दर्शन झाले. यामुळे परिसरात

तालुक्यातील दिघी महल्ले, वरूड बगाजी, सोनोरा काकडे, येरली या भागात काही दिवसांपूर्वी बिबट्या दिसत होता. यादरम्यान रविवारी पहाटे ६ वाजता गुंजी येथील रहिवासी असलेले हेमंत राजेंद्र टाले यांच्या बैलांच्या गोठ्याजवळ बिबट्या दिसला. त्यांनी काही ग्रामस्थांना फोन करून बोलवले. ग्रामस्थांनाही या बिबट्याचे दर्शन झाले. यानंतर सदर बिबट्या या परिसरातून निघून गेला. बिबट्याच्या पायाचे ठसे येथे आढळले असल्याची माहिती वनविभागाने दिली. परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जाताना एकत्रितपणे जावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे

Web Title: Leopard roaming in Gunji area