शहरं
Join us  
Trending Stories
1
झोपेत असतानाच इमारतीला लागली आग; कुवेतमध्ये ४० भारतीयांचा होरपळून मृत्यू
2
४-५ महिने थांबा, मला सरकार बदलायचंय; शरद पवारांचं मोठं विधान, मोदींवर निशाणा
3
ओडिशात पहिल्यांदाच BJP सरकार; मोहन चरण माझी यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ...
4
Maharashtra Politics : अजित पवार बारामतीमध्ये दीड लाख मतांनी जिंकतील; सुनील तटकरे यांनी व्यक्त केला विश्वास
5
भारतापेक्षा ३ पटीनं अधिक पैसे; कुवैतमध्ये छोट्या कामासाठी मिळतो 'इतका' पगार
6
महाराष्ट्र काँग्रेसची मोठी कारवाई! माजी आमदार नारायणराव मुंडे ६ वर्षांसाठी निलंबित
7
T20 World Cup 2024 IND vs USA Live Match : भारताने टॉस जिंकला अन् प्लेइंग इलेव्हनमध्ये पाहा कोणाला दिली संधी, कॅप्टनची माघार
8
"मोदी-शाहांसमोर बोलण्याची शिंदे-फडणवीस, अजित पवारांची हिंमत नाही, महाराष्ट्रावर पुन्हा अन्याय"
9
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विनोद तावडेंचं नाव आघाडीवर का?; जाणून घ्या कारणं
10
मराठा-ओबीसी वाद मिटवण्यासाठी फडणवीस निभावणार निर्णायक भूमिका; भुजबळांबद्दल म्हणाले...
11
Ration Card Aadhar Card : सरकारकडून सर्वसामान्यांना दिलासा! रेशन कार्ड आधारशी लिंक करण्याची मुदत वाढवली
12
मोठी बातमी: मविआचा तिढा सुटला; विधानपरिषद निवडणुकीतील दोन उमेदवारांकडून अर्ज मागे 
13
"मी साधा माणूस, मला देवाकडून कुठलाही आदेश येत नाही"; राहुल गांधींचा पंतप्रधानांना टोला
14
Maratha Reservation : "थोडं सबुरीने घ्या आणि सरकारला वेळ द्या"; मनोज जरांगे पाटलांना केंद्रीय मंत्र्यांची विनंती
15
मुंबईकर सुसाट! कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यात एका दिवसात २०,४५० वाहनांचा प्रवास
16
कुवेतमध्ये इमारतीला भीषण आग; ४१ जणांचा मृत्यू, अनेक भारतीयांचा समावेश
17
घरात फ्रिज आणि भिंतीमध्ये केवढी जागा असावी?; 'ही' चूक केल्यास लवकर खराब होईल कंप्रेसर 
18
T20 World Cup 2024 IND vs USA Live Match : भारत-अमेरिका सामना रद्द झाल्यास पाकिस्तानची नौका बुडणार; पावसाने वाढवली शेजाऱ्यांची धाकधुक 
19
इटलीमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना; PM मोदींच्या दौऱ्यापूर्वी खलिस्तान्यांचे कृत्य
20
उद्धव ठाकरेंनंतर नायडूंनी 'करून दाखवलं'; जे लालू यादव, मुलायम यांनाही जमलं नाही

‘त्या’ जेरबंद बिबट्याने आहार नाकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 5:00 AM

खैरी शिवारातून २५ एप्रिलला दुपारनंतर जेरबंद करून बिबट्याला परतवाडा येथील वाघाच्या दवाखान्यात ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये दाखल केले गेले. तेथे त्यावर ‘स्क्वीज केज’मध्ये उपचार सुरू आहेत. दुसऱ्या दिवशी २६ एप्रिलला भोजनात परत त्याला जिवंत कोंबडी दिली गेली. पण, वृत्त लिहिस्तोवर दुसऱ्या दिवशीही त्याने भोजन ग्रहण केले नव्हते.

ठळक मुद्देट्रॅपचाही होणार अभ्यास : गरज भासल्यास नागपूरला हलविणार

अनिल कडू ।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर तालुक्यातील खैरी शिवारात जेरबंद केल्या गेलेल्या बिबट्याने दवाखान्यात जेवण नाकारले आहे. भोजनात त्याला दिले गेलेल्या एक किलो चिकनकडे त्याने बघितलेही नाही. चिकन आवडले नसावे म्हणून त्याला जिवंत कोंबडी दिली गेली. पण, या जिवंत कोंबडीलाही त्याने चिडून ठार केले अन् तसेच सोडून दिले.खैरी शिवारातून २५ एप्रिलला दुपारनंतर जेरबंद करून बिबट्याला परतवाडा येथील वाघाच्या दवाखान्यात ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये दाखल केले गेले. तेथे त्यावर ‘स्क्वीज केज’मध्ये उपचार सुरू आहेत. दुसऱ्या दिवशी २६ एप्रिलला भोजनात परत त्याला जिवंत कोंबडी दिली गेली. पण, वृत्त लिहिस्तोवर दुसऱ्या दिवशीही त्याने भोजन ग्रहण केले नव्हते.बिबट्याच्या मागच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. वेदना दूर करण्याकरिता त्याला वेदनाशामक आणि अँटिबायोटिक दिले जात आहे. त्याच्यावर ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय घटारे, अमरावती येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज आडे व डॉ. नैनेश कथले औषधोपचार करीत आहेत.यापूर्वी खैरी शिवारात या बिबट्यावर डॉ. गजानन महल्ले आणि डॉ. मिलिंद काळे यांनी औषधोपचार केले. त्याच्या पायाचा एक्स-रे काढण्यात येणार आहे. त्याला नागपूरला हलविले जाणार आहे. ट्रान्झिट ट्रीटमेन्ट सेंटरमध्ये ज्या स्क्वीज केजमध्ये त्यावर उपचार सुरू आहेत, त्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून नजर ठेवली जात आहे. कूलरची व्यवस्था करण्यात आली आहे.जुन्या आठवणींना उजाळाज्या लोखंडी ट्रॅपमध्ये हा बिबट अडकला, त्याची बनावट वाघाची शिकार करणाºया मध्यप्रदेशातील कटनी येथील बहेलिया गँगकडून वापरल्या गेलेल्या ट्रॅपसारखी आहे. त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. पण, खैरी शिवारात आढळलेला हा ट्रॅप कटनी ट्रॅपपेक्षा वजनाने हलका आहे. हरिण किंवा काळवीट पकडण्याकरिता हा ट्रॅप लावला असावा, पण चुकून त्यात बिबट अडकल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.सुरक्षा वाढवलीज्या ट्रान्झिट ट्रीटमेन्ट सेंटरमध्ये बिबट्याला ठेवले आहे, त्या परिसरात सुरक्षा वाढविण्यात आली आहे. २४ तास वनकर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आल्या आहेत. वेळप्रसंगी पोलिसांचीही मदत घेतली जाणार आहे.ट्रान्झिट ट्रीटमेन्ट सेंटरमध्ये बिबट्याची काळजी घेतली जात आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या ऑब्झर्र्व्हेशनमध्ये त्याला ठेवण्यात आले आहे. परिसराची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.- डॉ. शिवबाला एस.उपवनसंरक्षक, सिपना वन्यजीव विभाग

टॅग्स :leopardबिबट्या