शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जंगलाबाहेर बिबट्याची संख्या वाढली; राज्यात २८०० ची नोंद

By गणेश वासनिक | Updated: March 13, 2023 16:24 IST

शिकारीच्या शोधार्थ शहरी भागाकडे धाव, वन विभागाकडे उपाययोजनांचा अभाव

अमरावती : जंगली श्वापदांचा अधिवासच मानवाने नष्ट केला आहे. वन्यजीवांना राहण्याकरिता, लपण्याकरिता पुरेशी जागाच उपलब्ध नसल्याने आता त्यांनी मानवी भागात हस्तक्षेप करायला सुरूवात केली आहे. या सगळ्यात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. जंगलाबाहेर बिबट्यांची संख्या वाढली असून, हल्ली राज्यात २८०० बिबट असल्याची नोंद आहे.

बिबट्यांचा अधिवास नेमका कोणता? हा आता संशोधनाचा विषय ठरू लागला आहे. व्याघ्र प्रकल्पात बिबट्याची संख्या वाढीस लागली असताना आता ग्रामीण भागात बिबट्यांचे हल्ले वाढले आहे. मागील काही महिन्यांपासून बिबट्यांच्या हल्ल्यांनी ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. अलीकडे बिबट घरात, शेतात, शिवारात, शहरी भागात दिसून येत आहे. जंगलात बिबट्यांना पुरेशे खाद्य मिळत नाही, परिणामी त्यांनी शिकारीसाठी शहराकडे धाव घेतली आहे. राज्यात बिबट्याची संख्या नेमकी किती, याविषयी राज्याच्या वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक महिप गुप्ता यांच्याशीसंपर्क साधला असता तूर्त ही आकडेवारी सांगता येणार नाही, असे ते म्हणाले.

४२ बिबट मृत्युमुखी पडले

प्राणी, वृक्ष संवर्धनाविषयी समाजात जनजागृती करण्याचे काम डब्ल्यूपीएस ही संस्था करते. जानेवारी ते डिसेंबर २०२२ या वर्षात राज्यात ४२ बिबट मृत्युमुखी पडल्याचे वास्तव आहे. ज्या भागात शिकारीसाठी बंदी आहे, त्या भागात अवैधरित्या १५ बिबट्याची शिकार करण्यात आली आहे. हिंस्त्र प्राण्यांचा नागरी वस्त्यांमध्ये वावर वाढला ही बाब धोकादायक मानली जात आहे. तर दुसरीकडे अनेकांनी कायदा हातात घेऊन त्याचे उल्लंघन केल्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत.

व्याघ्र प्रकल्प बिबट्यांनी ओव्हर फ्लो

विदर्भातील मेळघाट, ताडोबा-अंधारी, बोर अभयारण्य, पेंच, नवेगाव -नागझिरा, तर पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री अभयारण्यात बिबट्यांची संख्या ओव्हर फ्लो झाली आहे. बिबट्यांना वाघांची धास्ती असल्याने ते शिकारीच्या शोधार्थ जंगलाबाहेर पडत आहेत. बिबट दीड वर्षाचा होताच तो शिकारीसाठी सज्ज होतो. बिबट उसाचे मळे, संत्र्यांचे बगीचे आणि मुबलक पाणी, शिकारीची सोय असलेल्या भागात त्यांचा वावर वाढला आहे. बिबट मादीची प्रजनन क्षमता अधिक असून, एकाच वेळी चार बछडे जन्मास घालत असल्यामुळे बिबट्याची संख्या वाढीस लागत आहे.

या भागात बिबट्याचा विस्तार वाढला

अमरावती जिल्ह्यातील पोहरा, वरूड, चांदूर रेल्वे, मोर्शी, भातकुली, तर यवतमाळ, पुणे, जुन्नर, मंचर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड, ठाणे, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, अहमदनगर, पालघर या शहरी भागात बिबट्याचा विस्तार वाढला आहे.

टॅग्स :leopardबिबट्याenvironmentपर्यावरणAmravatiअमरावती