लेहेगाव ग्रामपंचायत मोर्शी तालुक्यातून प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:24 IST2021-02-21T04:24:25+5:302021-02-21T04:24:25+5:30

फोटो - लेहेगाव १९ एस लेहेगाव : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव योजनेंतर्गत उत्कृष्ट कार्य ...

Lehegaon Gram Panchayat from Morshi taluka first | लेहेगाव ग्रामपंचायत मोर्शी तालुक्यातून प्रथम

लेहेगाव ग्रामपंचायत मोर्शी तालुक्यातून प्रथम

फोटो - लेहेगाव १९ एस

लेहेगाव : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव योजनेंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्काराने सन्मानित केले जाते. या पुरस्काराकरिता मोर्शी पंचायत समिती अंतर्गत लेहेगाव ग्रामपंचायतीची प्रथम पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

मोर्शी तालुक्यातील ग्रामपंचायत लेहेगाव यांनी विविध समाजपयोगी उपक्रम राबवितानाच प्रशासकीय नियम व अटींचे पालन करून गावकऱ्यांना विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या. गावात वृक्षसंवर्धन व स्वच्छता, शिक्षण, सौरऊर्जा आदी योजनांवर सरपंच राजेंद्र तट्टे, ग्रामसेविका व्ही.एस. प्रतीके, उपसपरंच सरस्वती तंतरपाळे, सदस्य रणजित तट्टे, रमण पानसे, संध्या इगाणे, चंद्रकला गोरे आदी गावाच्या विकासासाठी झटत आहेत. मोर्शी कृषिउत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय तट्टे, डॉ. धनंजय तट्टे, माजी जिल्हा परिषद सदस्य विद्या तट्टे, गटविकास अधिकारी पवार, विस्तार अधिकारी एन.एस. सुपले आदींनी पुरस्काराबद्दल समाधान व्यक्त केले.

-----------------

Web Title: Lehegaon Gram Panchayat from Morshi taluka first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.