विधिमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समिती अमरावतीत
By Admin | Updated: June 21, 2014 01:14 IST2014-06-21T01:14:49+5:302014-06-21T01:14:49+5:30
विधान मंडळ सचिवालयाची अनुसूचित जमाती कल्याण समिती विविध विभागातील झाडाझडती घेण्यासाठी ...

विधिमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समिती अमरावतीत
अमरावती : विधान मंडळ सचिवालयाची अनुसूचित जमाती कल्याण समिती विविध विभागातील झाडाझडती घेण्यासाठी २४ ते २७ जून या कालावधीत जिल्ह्यात दाखल होणार आहे. या समितीत राज्यभरातील १५ आमदारांचा समावेश आहे. समितीच्या दौऱ्याने प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.
राज्यशासनामार्फत अनुसूचित जमातीसाठी विविध विभागामार्फत विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात. या योजनाची प्रगती, लाभार्थ्यांना दिलेला लाभ, शासन निधीचा विनीयोग, प्रशासनातील नोकर भरतीतील रिक्त पदाचा अनुशेष, आरोग्य, शिक्षण व अशा महत्वाच्या विषयांचा लेखाजोखा या समितीमार्फत तपासल्या जाणार आहे. समितीने दौऱ्यात जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, महापालिका कार्यालय, नगरपरिषद, विद्युत वितरण कंपनी, पोलीस विभाग, आदिवासी विकास विभाग या विभागांना भेटी देणार आहे. अनुसूचित जमातीसाठी राबविल्या जाणाऱ्या योजनाची प्रगती व उणीवा याची पडताळणी १५ आमदारांची समिती करणार असल्याने प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. समितीसमोर कामकाजातील उणीवा राहू नये याची खबरदारी घेतली जात आहे. (प्रतिनिधी)