जि.प.निवडणुकीत विधानसभेचे गणित

By Admin | Updated: September 21, 2014 23:42 IST2014-09-21T23:42:42+5:302014-09-21T23:42:42+5:30

मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शनिवारी उशिरा रात्री झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर काँग्रेसने राष्ट्रवादीला बाजूला ठेवण्याचा निर्णय घेऊन गत

Legislative Assembly of the ZP election | जि.प.निवडणुकीत विधानसभेचे गणित

जि.प.निवडणुकीत विधानसभेचे गणित

महापालिका पॅटर्न : संजय खोडके यांची भूमिका ठरली महत्त्वाची
गणेश वासनिक - अमरावती
मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शनिवारी उशिरा रात्री झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर काँग्रेसने राष्ट्रवादीला बाजूला ठेवण्याचा निर्णय घेऊन गत निवडणुकीतील पराभवाचा बदला घेतला.
रविवारी जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवडणूक अविरोध पार पडली. काँग्रेसचे सतीश उईके अध्यक्ष तर वऱ्हाड विचारमंचचे सतीश हाडोळे उपाध्यक्ष म्हणून निर्वाचित झाले. जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी होऊन सत्तेचे समीकरण जुळून येईल, असे संकेत होते. मात्र, या सर्व घडामोडींमध्ये विधानसभा निवडणुकीचे राजकीय गणित जुळविण्यात काँग्रेसचे नेते सरस ठरले, हे विशेष.
जिल्हा परिषदेत ५९ सदस्य संख्या आहे. यात काँग्रेसचे सर्वाधिक २५ सदस्य आहेत. काँग्रेसला सत्तेसाठी केवळ ५ सदस्यांची आवश्यकता होती. मात्र, गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजप, शिवसेना, प्रहार, बसपा यांच्याशी अभद्र युती करुन काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले. ही बाब त्यावेळी काँग्रेसच्या चांगलीच जिव्हारी लागली होती. त्यामुळे राष्ट्रवादीला हिसका दाखविण्याच्या प्रतीक्षेत काँग्रेसचे नेते होते. अशातच जिल्हा परिषदेत ८ सदस्य संख्या असलेल्या राष्ट्रवादीत दुफळी निर्माण झाली. संजय खोडके यांनी राष्ट्रवादीच्या ८ सदस्यांपैकी ५ सदस्य आपल्या तंबूत खेचून आणले. एवढेच नव्हे, तर या पाच सदस्यांचा जिल्हा परिषदेत वऱ्हाड विचार मंच या नावाने स्वतंत्र गट स्थापन करुन नवी यशस्वी राजकीय खेळीदेखील केली. सत्तास्थानी असलेल्या राष्ट्रवादीला या खेळीमुळे जबर हादरा बसला. राष्ट्रवादीत तत्कालीन अध्यक्षांसह केवळ तीनच सदस्य राहिलेत. त्यामुळे ऐनवेळी समीकरण बदलले आहे.

Web Title: Legislative Assembly of the ZP election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.