चांदूर रेल्वे येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:17 IST2021-08-25T04:17:14+5:302021-08-25T04:17:14+5:30

तालुका विधी सेवा समितीचे आयोजन वकील संघाच्या सभागृहात तालुका विधी सेवा समितीचे आयोजन चांदूर रेल्वे : स्थानिक न्यायालयात कायदेविषयक ...

Legal guidance camp at Chandur Railway | चांदूर रेल्वे येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर

चांदूर रेल्वे येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर

तालुका विधी सेवा समितीचे आयोजन

वकील संघाच्या सभागृहात तालुका विधी सेवा समितीचे आयोजन

चांदूर रेल्वे : स्थानिक न्यायालयात कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन सोमवारी स्थानिक तालुका विधी सेवा समितीतर्फे करण्यात आले होते.

चांदूर रेल्वे येथील न्यायालयातील वकील संघाच्या सभागृहात पार पडलेल्या कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराच्या अध्यक्षस्थानी न्यायाधीश के.व्ही. लुंगे होते. प्रमुख अतिथी म्हणून ॲड. भुयार, वकील संघाचे उपाध्यक्ष अँड. अहेफाज राराणी, पोलीस उपनिरीक्षक गणेश मुपडे यांची उपस्थिती होती. मार्गदर्शन शिबिरामध्ये वाहतुकीचे नियमाबद्दल न्यायाधीश के.व्ही. लुंगे व गणेश मुपडे यांनी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाला ॲड. कारमोरे, ॲड. महाजन यांच्यासह इतर वकील मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन ॲड. वाल्दे व आभार प्रदर्शन ॲड. अहफाज राराणी यांनी केले.

240821\img-20210824-wa0017.jpg

photo

Web Title: Legal guidance camp at Chandur Railway