चांदूर रेल्वे न्यायालयात कायदेविषयक शिविर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:14 IST2021-09-21T04:14:08+5:302021-09-21T04:14:08+5:30
चांदूर रेल्वे : कॉमन मिनिमम प्रोग्राम - २०२१ अंतर्गत शुक्रवारी चांदूर रेल्वे येथील बार रूमच्या सभागृहात कायदेविषयक शिबिराचे आयोजन ...

चांदूर रेल्वे न्यायालयात कायदेविषयक शिविर
चांदूर रेल्वे : कॉमन मिनिमम प्रोग्राम - २०२१ अंतर्गत शुक्रवारी चांदूर रेल्वे येथील बार रूमच्या सभागृहात कायदेविषयक शिबिराचे आयोजन चांदूर रेल्वे येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय व तालुका विधी सेवा समितीद्वारे करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष के.व्ही. लुंगे होते. प्रमुख पाहुणे म्हणून चांदूर रेल्वे वकील संघाचे अध्यक्ष ॲड. शिवाजीराव देशमुख, उपाध्यक्ष ॲड. अहफाज राराणी, सचिव ॲड. शिवाजी वाघ, कोषाध्यक्ष ॲड. किशोर झाडे, एम.व्ही. देशमुख आदींची उपस्थिती होती. यावेळी नालसा स्कीम विषयी ॲड. शिवाजीराव देशमुख यांनी उपस्थितांना माहिती दिली. ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार यावर ॲड. व्ही.एम. देशमुख यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणातून न्यायाधीश के.व्ही. लुंगे यांनीसुद्धा यथोचित मार्गदर्शन केले. संचालन व आभार प्रदर्शन ॲड. एल.एम. कदम यांनी केले. यावेळी चांदूर रेल्वे येथील वकील व न्यायालयातील कर्मचारी उपस्थित होते.