बांधकाम कंत्राटदाराविरुद्ध कायदेशीर कारवाई
By Admin | Updated: March 23, 2015 23:55 IST2015-03-23T23:55:13+5:302015-03-23T23:55:13+5:30
रस्ते खडीकरण, डांबरीकरण तसेच निर्धारित वेळेत कामे पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत

बांधकाम कंत्राटदाराविरुद्ध कायदेशीर कारवाई
अमरावती : रस्ते खडीकरण, डांबरीकरण तसेच निर्धारित वेळेत कामे पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. तत्पुर्वी या कंत्राटदारांना कायदेशीर कारवाई साठी नोटीस बजावल्या जाणार आहेत.
शुक्रवारी २० मार्च रोजी महापालिकेत पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत प्रकाश बनसोड, अर्चना इंगोले, प्रदीप दंदे, भूषण बनसोड, अमोल ठाकरे, दिगंबर डहाके, अ. रफिक, प्रवीण हरमकर, अजय गोंडाणे, अरुण जयस्वाल, सुजाता झाडे आदिंनी महापालिका कंत्राटदारांच्या कार्यप्रणालीवर ताशेरे ओढले होते.
बांधकाम विभागाचे कंत्राटदारांवर अंकुश नसल्याचा आरोप देखील करण्यात आला. सदस्यांची आक्रमकता बघून महापौर चरणजितकौर नंदा यांनी ज्या कंत्राटदारांनी अटी, शर्तीला अधीन राहून कामे पूर्ण केली नसतील, अशांना काळ्या यादी टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार प्रशासनाला निर्देशही दिले होते. सभागृहाचे कार्यवृंत्तातावर महापौरांनी स्वाक्षरी व्हायची आहे.
सर्वसाधारण सभेत सदस्यांनी कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली असली तरी महापौरांनी या संदर्भात कोणता निर्णय घेतला हे कार्यवृत्तानंतरच स्पष्ट होईल. ज्या कंत्राटदारांनी आर्थिक नुकसान केले त्यांना कायदेशीर कारवाईच्या सामोरे जावे लागेल. सहजासहजी काळ्या यादीत टाकता येत नाही.
-ज्ञानेंद्र मेश्राम, शहर अभियंता, महापालिका