बंदीजनांच्या हातून निर्मित एलईडी दिव्यांनी कारागृह होणार प्रकाशमय

By Admin | Updated: February 6, 2016 00:20 IST2016-02-06T00:20:50+5:302016-02-06T00:20:50+5:30

हातून न कळत झालेल्या चुकांचे प्रायश्चित्त कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बंदीजणांनी एलईडीे तयार केले आहे.

Led by the captives, the lamp will be lit in jail | बंदीजनांच्या हातून निर्मित एलईडी दिव्यांनी कारागृह होणार प्रकाशमय

बंदीजनांच्या हातून निर्मित एलईडी दिव्यांनी कारागृह होणार प्रकाशमय

२२ जणांचे प्रशिक्षण : दोन ते २० व्हॅटचे १०० दिवे तयार
अमरावती : हातून न कळत झालेल्या चुकांचे प्रायश्चित्त कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बंदीजणांनी एलईडीे तयार केले आहे. हा उपक्रम राज्यात पहिल्यांदा अमरावतीत राबविण्यात आला असून शनिवारी कारागृह उपमहानिरिक्षक स्वाती साठे यांच्या हस्ते १०० एलईडी दिवे लावून कारागृह प्रकाशमय केले जाणार आहे.
अमरावती मध्यवर्ती कारागृहात ‘सुधारणा व पुनर्वसन’ अंतर्गत कैद्यांमध्ये असलेल्या सुप्त गुणानुसार त्यांच्या हाताला रोजगार देण्याचा उपक्रम राबविला जातो. त्याअनुषंगाने गतवर्षी २२ बंदीजणांना येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत वीजतंत्री म्हणून अभ्यासक्रम पूर्ण केला. विद्युत कामासंदर्भाचे प्रशिक्षण प्रमाणपत्र देखील या बंदीजणांनी प्राप्त केले होते. दरम्यान कारागृहात महात्मा गांधी इंस्टिट्युट आॅफ इंडियाच्या माध्यमातून एलईडी दिवे तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. आयटीआयमध्ये वीजतंत्री म्हणून प्रशिक्षण घेतलेल्या २२ बंदीजणांनी एलईडी दिवे निर्माण करण्याचे प्रशिक्षण घेतले. या बंदीजणांनी कौशल्य पणाला लावून एखादा नामांकित कंपनीला लाजवेल, असे आकर्षक व डिझाईनचे एलईडी दिवे तयार केले आहे. हे एलईडी दिवे तयार करताना कारागृह प्रशासनाने नामांकित कंपन्याचे सुटे भाग वापरले आहे. बाजारात एलईडी दिव्यांच्या असलेल्या किंमतीच्या तुलनेत हे दिवे निम्म्या दरात निर्माण करण्याची किमया बंदीजणांनी केलीे आहे. कारागृह प्रशासनाने वीज बचतीचा मंत्र स्वीकारला असून एकाच वेळी १०० एलईडी दिवे लावण्याचा बहुमान देखील अमरावतीला जात आहे.

एलईडीतून बंदीजनांना रोजगार
कारागृहात बंदीस्त असलेल्या बंदीजणांना एलईडी दिवे निर्मितीतून भविष्यात रोजगार उपलब्ध होईल, असा आशावाद कारागृह प्रशासनाचा आहे. शासन निर्णयानुसार सध्या कारागृहातून ७० वस्तू व साहित्य शासकीय कार्यालये, महाविद्यालय, शाळा पाठविण्यासाठी बंदीजण तयार करतात. मात्र एलईडी दिवे पुरवठा करण्याचा ७१ वा क्रमांक लागल्यास कारागृहासाठी ती मोठी उपलब्धी ठरेल, असे बोलले जात आहे.

वीज बचत व बंदीजणांसाठी एलईडी दिवे लाभदायक ठरणारे आहे. पथदिव्यांसाठीदेखील जास्त व्हॅटचे दिवे निर्माण केले जातील. शासनाने कारागृहातून एलईडी खरेदी करण्याचे ठरविले तर ते बंदीजणांसाठी रोजगाराचे मोठे साधन ठरेल.
- एस. व्ही. खटावकर,
अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह.

Web Title: Led by the captives, the lamp will be lit in jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.