आरटीई प्रवेशाची यंदा एकच सोडत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:34 IST2021-02-05T05:34:31+5:302021-02-05T05:34:31+5:30

अमरावती:आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यासाठी खासगी शाळेत राखीव असलेल्या २५ टक्के जागासाठी यंदाही एकच सोडत काढली जाणार ...

Leaving only one of the RTE admissions this year | आरटीई प्रवेशाची यंदा एकच सोडत

आरटीई प्रवेशाची यंदा एकच सोडत

अमरावती:आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यासाठी खासगी शाळेत राखीव असलेल्या २५ टक्के जागासाठी यंदाही एकच सोडत काढली जाणार आहे. प्रवेशाबाबतचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले आहे.शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आरटीई जागांवर प्रवेशासाठी पात्रधारक शाळांना शनिवार ३० जानेवारी पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन प्राथमिक शिक्षण विभागाने केले आहे.

आरटीई अंतर्गत दरवर्षी दुर्बल घटकातील २५ टक्के विद्यार्थ्यांना खासगी शाळांत प्रवेश दिला. यावर्षी प्रवेशासाठी ९ फेब्रुवारीपासून ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत.वेळापत्रकानुसार ६ ते २६ फेब्रुवारी दरम्यान पालकांना अर्ज करावयाचे आहेत. पाच मार्च रोजी प्रवेशाच्या जागांसाठी सोडत काढली जाणार आहे.अर्ज निवडलेल्या पालकांनी ९ ते २६ मार्च अखेर कागदपत्रांची पडताळणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.त्यानंतर प्रतीक्षा यादी जाहीर केली जाणार आहे. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना चार टप्प्यात प्रवेश घेता येणार आहे.यावर्षी सुध्दा एकच सोडत काढली जाणार असून शाळेच्या रिक्त जागांच्या संख्येने एवढीच प्रतीक्षा यादी राहणार आहे.प्रतीक्षा यादी पूर्ण झाल्यानंतही शाळेत जागा रिक्त असल्यास पुन्हा सोडत काढली जाणार आहे.

बॉक्स

आर्थिक व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळेत प्रवेश

प्रवेशासाठी ९ फेब्रुवारी पासून ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत.

रिक्त जागांच्या संख्येएवढेच प्रतीक्षा यादी राहणार आहे.

Web Title: Leaving only one of the RTE admissions this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.