ंलग्नसोहळा सोडून वऱ्हाड्यांची वाहनांकडे धाव
By Admin | Updated: January 24, 2017 00:17 IST2017-01-24T00:17:11+5:302017-01-24T00:17:11+5:30
शहरातील शेगाव नाका ते रहाटगाव मार्गावरील एका मंगलकार्यालयात विवाह सोहळा सुरू असताना ऐन लग्न लागण्याच्या वेळी ...

ंलग्नसोहळा सोडून वऱ्हाड्यांची वाहनांकडे धाव
वाहतूक पोलिसांची कारवाई : शेगाव नाका-रहाटगाव मार्गावरील प्रकार
अमरावती : शहरातील शेगाव नाका ते रहाटगाव मार्गावरील एका मंगलकार्यालयात विवाह सोहळा सुरू असताना ऐन लग्न लागण्याच्या वेळी कार्यालयासमोर भररस्त्यावर उभ्या वाहनांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली अन् वर-वधुच्या डोक्यावर टाकण्यासाठी हाती अक्षता घेऊन उभे असलेले वऱ्हाडी लग्न सोडून चक्क आपापल्या वाहनांकडे पळाले. काही वेळ काय झाले ते कळलेच नाही. परंतु पोलिसांच्या याकारवाईमुळे लग्नसोहळ्यात काही वेळ पळापळ निर्माण झाली होती.
शेगाव नाका ते रहाटगावकडे जाणाऱ्या मार्गावर एक मंगल कार्यालय आहे. या मंगल कार्यालयातील विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वऱ्हाड्यांची वाहने नेहमीच मंगल कार्यालयाबाहेर रस्त्यावर उभी असतात.
पोलिसांचा गजब कारभार
अमरावती : या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. सोमवारी दुपारी या मंगलकार्यालयात एक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. वऱ्हाड्यांच वाहने नेहमीप्रमाणे भर रस्त्यात उभी होती. अचानक वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरेंसह काही पोलीस येथे पोहोचले. वऱ्हाड्यांना याची कुणकुण लागताच मंगलाष्टके सोडून वऱ्हाडी बाहेर पळाले आणि आपापली वाहने सुरक्षित स्थळी हलवू लागले. त्यामुळे नागरिकांची एकच गर्दी झाली होती.
आॅर्केस्ट्राचे तिकीट न घेतल्याने कारवाई ?
पोलीस विभागातर्फे वेलफेअर निधीसाठी आॅर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले. यासाठी तिकिटांची विक्री पोलिसांकडून युद्धस्तरावर सुरू आहे. मंगल कार्यालय व्यवस्थापनाकडून तिकीट खरेदीबाबत सहकार्य करण्यात आले नाही. त्यामुळे ही कारवाई केल्याचा संशय काही नागरिकांनी व्यक्त केला.
मंगलकार्यालयासमोरील रस्त्यावर वाहने उभी करण्यात आली होती. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. कारवाई करताना नागरिकांनी अडथळा निर्माण केला. तीन वाहनांवर कारवाई करण्यात आली.
- अर्जुन ठोसरे, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा