महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत शुक्रवारी

By Admin | Updated: October 5, 2016 00:20 IST2016-10-05T00:20:20+5:302016-10-05T00:20:20+5:30

फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने शुक्रवार ७ आॅक्टोबर रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

Leave a reservation for municipal elections on Friday | महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत शुक्रवारी

महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत शुक्रवारी

उत्सुकता शिगेला : प्रभागरचनाही होणार जाहीर
अमरावती : फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने शुक्रवार ७ आॅक्टोबर रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्याचवेळी प्रभागरचनेचे प्रारुप प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
येथिल टाऊन हॉलमध्ये शुक्रवारी सकाळी ११ वाजता नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिलांसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. तत्पुर्वी मंगळवारी आयुक्त हेमंत पवार यांच्या नेतृत्वात टाऊन हॉलमध्ये बंदद्वार आरक्षण सोडतीची रंगित तालिम घेण्यात आली. ७ आॅक्टोबरलाच प्रभागरचना जाहिर होत असल्याने आजी माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांसह इच्छूकांची उत्सूकता टांगणीला लागली आहे.
महापालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक चार सदस्यीय प्रभागपध्दतीने होत असल्याने प्रभागरचनेकडे सर्वांंचे लक्ष लागले आहे. शुक्रवारी आरक्षणासोबतच प्रभागरचना जाहीर होईल व त्यानंतरच राजकिय समीकरणांना वेग येणार आहे.
आगामी महापालिका निवडणुक ीत ४३ प्रभागाएैवजी २२ प्रभाग राहणार आहेत. यातील २१ प्रभागातून प्रत्येकी चार आणि एका प्रभागातून तीन असे एकूण ८७ नगरसेवक निवडून येतिल.ही निवडणुक चार सदस्यीय प्रभाग पध्दतीने होणार असल्याने अनेकांची समिकरणे बिघडली आहेत. त्यामुळे कुठला प्रभाग आणि कुठला पक्ष आपल्यासाठी सेफ राहिल,याची चाचपणी इच्छूकांनी चालविली आहे.शुक्रवारी २२ प्रभागाच्या सिमारेषा स्पष्ट झाल्यानंतर राजकिय वातावरण ढवळून निघणार आहे.बहुसदस्यीय प्रभागामध्ये कुठला प्रभाग आपल्यासाठी सेफ राहिल,याची चाचपणी सुरु झाली असली तरी शुक्रवारनंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)

तक्रारीचा सूर
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत निघाल्यानंतर प्रभागरचनेवर आक्षेप घेण्यात आले. सत्ताधारी पक्षाने प्रभागाची मोडतोड केल्याचा आरोप आहे. त्यामुळे अमरावतीतही असा प्रकार नाकारता येणार नाही,असे मत लोक मांडू लागले आहेत.

२५ पर्यंत हरकती
७ आॅक्टोबरला आरक्षणासह प्रभागरचनेचे प्रारुप प्रसिध्द होईल. यानंतर १० आॅक्टोबरला प्रारुप प्रभागरचनेची अधिसुचना राजपत्रात प्रसिध्द होईल. १० ते २५ आॅक्टोबर या कालावधीत प्रारुप प्रभागरचनेवर हरकती व सूचना मागविण्यात येतील.

Web Title: Leave a reservation for municipal elections on Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.