शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

लोकमत स्पेशल : तब्बल १६५ वर्षांनंतर अद्भूत योग! सन २०२० मध्ये लीप इयर व अधिकमास

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 12:30 IST

हिंदू धर्मात ऋतू हे सूर्यावर, तर सन हे चंद्रावर अवलंबून असतात. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या भ्रमणामुळे सूर्य हा १२ राशीमधून प्रवास करीत कालचक्राचे एक वर्षे पूर्ण करतो.

सुभाष दाभिरकर

वरूड (अमरावती) - सन २०२० मध्ये एकाच वर्षात लीप इयर (म्हणजे ३६६ दिवस) व अधिक महिना असा अद्भूत योग १६५ वर्षांनी जुळून आला आहे. टेंभुरखेडा येथील गणितज्ज्ञ सुभाष दाभिरकर यांनी ही माहिती दिली. 

सन २०२० मध्ये शुक्रवार १८ सप्टेंबर २०२० रोजी अधिक अश्विन मास सुरू होत आहे. हिंदू धर्मात ऋतू हे सूर्यावर, तर सन हे चंद्रावर अवलंबून असतात. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या भ्रमणामुळे सूर्य हा १२ राशीमधून प्रवास करीत कालचक्राचे एक वर्षे पूर्ण करतो. त्यास ३६५ दिवस आणि ६ तास लागतात. या काळात इंग्रजी कालदर्शिकेनुसार १२ महिने पूर्ण होतात. मात्र, चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्यावर आधारलेले १२ हिंदू चंद्रमास ३५४ दिवसांतच म्हणजे ११ दिवस आधीच पूर्ण होतात. हे अंतर तीन वर्षांनी सुमारे १ महिन्याचे होते. सौर मास व चंद्र मास यांची सांगड घालण्यासाठी आणि ११ दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी पंचांगात अधिक महिन्याची व क्षय महिन्याची योजना करण्यात आलेली आहे. अतिरिक्त दिवसांचा महिना म्हणूनच याला अधिक महिना म्हटले जाते.

आषाढी एकादशीपासून चतुर्मास प्रारंभ झाला आहे. यंदाच्या चतुर्मासाचे विशेष महत्त्व म्हणजे हा काळ यावर्षी ५ महिन्यांचा असेल. कारण अश्विन महिना यावर्षी पुरुषोत्तम म्हणजेच अधिक असेल. भाद्रपद वद्य प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या हा काळ पितृपक्ष म्हणजेच श्राद्ध विधीचा मानला जातो. पितृ पंधरवडा हा पूर्वजांच्या स्मरणाचा काळ मानला जातो. यंदा सर्वपित्री अमावस्या आणि नवरात्रात तब्बल एका महिन्याचे अंतर आहे, हाही मोठा अद्भूत योग आहे.

सन २०२० मध्ये बुधवार, २ सप्टेंबरपासून पितृपक्षास सुरुवात झाली. गुरुवार, १७ सप्टेंबर रोजी पितृ पंधरवडा समाप्त होईल. भाद्रपद अमावशा म्हणजेच सर्वपित्री अमावशेची सांगता होताच दुसऱ्या दिवशी घटस्थापनेस प्रारंभ होते. अधिकमासाला पुरुषोत्तम मास, धोंड्याचा महिना, संसर्प मास संबोधतात. २६ ऑक्टोबर रोजी विजयादशमी, १४ नोव्हेंबर रोजी दिवाळी आणि २५ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. यानंतर चातुर्मास समाप्त होईल. चतुर्मास प्रारंभ झाल्यानंतर विवाह, मुंडन, मुंज, कान टोचणे यासारखी शास्त्रानुसार मंगलकार्य टाळली जातात. या चातुर्मासात उपवास आणि साधना यांना अधिक महत्त्व असते. चातुर्मासाचा काळ कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीला समाप्त होतो.

टॅग्स :Earthपृथ्वी