विद्यापीठात उत्तरपत्रिका आढळल्या कचऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 06:01 IST2019-11-13T06:00:00+5:302019-11-13T06:01:00+5:30
विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा कारभार ‘इन कॅमेरा’ चालतो. असे असताना मूल्यांकन विभागातून उत्तरपत्रिका कचऱ्यात गेल्या कशा, हा संशोधनाचा विषय आहे. उन्हाळी परीक्षांचे मूल्यांकन आणि निकाल जाहीर झाले आहेत. त्यामुळे मूल्यांकन विभागाच्या भांडारातून या उत्तरपत्रिकांना पाय कसे फुटले, याचा शोध घेतल्यास बरेच तथ्य बाहेर आल्याशिवाय राहणार नाहीत, असे बोलले जात आहे.

विद्यापीठात उत्तरपत्रिका आढळल्या कचऱ्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी २०१९ परीक्षेच्या उत्तरपत्रिका दोन दिवसांपूर्वी कचºयात आढळल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. दरम्यान, कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी मंगळवारी सुटीच्या दिवशी परीक्षा विभागात भेट दिल्याची विश्वसनीय माहिती आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा कारभार ‘इन कॅमेरा’ चालतो. असे असताना मूल्यांकन विभागातून उत्तरपत्रिका कचऱ्यात गेल्या कशा, हा संशोधनाचा विषय आहे. उन्हाळी परीक्षांचे मूल्यांकन आणि निकाल जाहीर झाले आहेत. त्यामुळे मूल्यांकन विभागाच्या भांडारातून या उत्तरपत्रिकांना पाय कसे फुटले, याचा शोध घेतल्यास बरेच तथ्य बाहेर आल्याशिवाय राहणार नाहीत, असे बोलले जात आहे. ‘मास्किंग डी मॉस्किंग’ असे उत्तरपत्रिकांची प्रक्रिया चालत असून, याद्वारे उत्तरपत्रिका कचºयात फेकल्या असाव्यात, असा दाट संशय परीक्षा विभागाला आहे. मात्र, परीक्षा विभागातील प्रत्येक कर्मचाºयावर तिसरा डोळा असतो. काहीही गैर होऊ नये, अशी व्यवस्था विद्यापीठाने परीक्षा विभागात केली आहे.
उत्तरपत्रिका कचºयात आढळल्याप्रकरणी चौकशी प्रारंभ होईल, असे संकेत आहेत. सहा महिन्यांपर्यंत उत्तरपत्रिकांची सुरक्षा आणि जतन करण्याची जबाबदारी परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकांवर सोपविली आहे. कचºयातील उत्तरपत्रिकाप्रकरणी पुनर्मूल्यांकनाचे धागेदोरे असल्याची चर्चा रंगली आहे.
पुनर्मूल्यांकनात गुणवाढीचा सपाटा
उन्हाळी २०१९ परीक्षेत नापास झालेल्या बहुतांश विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनात गुणवाढ झाल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे यापूर्वी मूल्यांकन करणाºया प्राध्यापकांवर संशयाची सुई आहे. काही विद्यार्थ्यांना एक-दोन नव्हे, चक्क पुनर्मूल्यांकनात ३० ते ४० गुणांची वाढ मिळाल्याची माहिती आहे. गुणवाढीचे संशोधन केल्यास ‘फिक्ंिसग’मध्ये कोण हे उघडकीस येईल, असे सूत्रांनी सांगितले.
बी.एस्सी. अभ्यासक्रमाच्या दोन उत्तरपत्रिका कचऱ्यात आढळल्या आहेत. मूल्यांकनादरम्यान काही उत्तरपत्रिका गहाळ होत्या. ही बाब फार गंभीर नाही. तरीही याप्रकरणी दक्षता घेण्यात येत आहे.
- हेमंत देशमुख
संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, अमरावती विद्यापीठ