धामणगाव तालुक्यात राजकीय पक्षप्रणित आघाडीची सरशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:16 IST2021-01-19T04:16:41+5:302021-01-19T04:16:41+5:30
सात ग्रापंमध्ये त्रिशंकू स्थिती : धामणगाव रेल्वे : तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतीच्या मतमोजणीत काँग्रेस व भाजपप्रणित पॅनेलने विजय ...

धामणगाव तालुक्यात राजकीय पक्षप्रणित आघाडीची सरशी
सात ग्रापंमध्ये त्रिशंकू स्थिती :
धामणगाव रेल्वे : तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतीच्या मतमोजणीत काँग्रेस व भाजपप्रणित पॅनेलने विजय प्राप्त केला. पैकी ३२ ग्रामपंचायतींवर काँग्रेसप्रणित उमेदवार निवडून आल्याचा दावा माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी केला. जुना धामणगाव, जळगाव आर्वी, आजणगाव, देवगाव, रायपूर, सोनेगाव खर्डा, दिघी महल्ले, सावळा, उसळगव्हाण, तिवरा, ढाकुलगाव, पिंपळखुटा, वसाड, कावली, बोरवघड, शिंदोडी, ग्रामपंचायतींत भाजपने वर्चस्व निर्माण केल्याचे आमदार प्रताप अडसड यांनी सांगितले. तालुक्यातील शेंदूरजना खुर्द, हिरपूर, निंभोरा राज, नायगाव, वाढोणा, विरुळ रोंघे, बोरगाव धांदे, वाघोली, झाडा, तरोडा, अंजनसिंगी, वरूड बगाजी, पेठ रघुनाथपूर, गव्हा फरकाडे, गव्हा निपाणी, मंगरूळ दस्तगीर, चिंचोली आसेगाव, निंबोली, विटाळा वकनाथ, बोरगाव निस्ताने, दाभाडा, काशीखेड, निंभोरा बोडखा, चिंचोली, कळाशी, आसेगाव, मंगरूळ दस्तगिर, तळेगाव दशासर, भातकुली रेणुकापूर या ग्रामपंचायतींत काँग्रेससमर्थित उमेदवार विजयी झाले आहे. हिंगणगाव, जळगाव, मंगरूळ तळणी येथे राष्ट्रवादी काँग्रेस तसेच अशोकनगर येथे शिवसेनेचे मनोज कडू यांचे पॅनेल विजयी झाले.
तीन ग्रामपंचायतींत ईश्वरचिठ्ठी
जुना धामणगाव प्रभाग क्रमांक सहामध्ये पूजा आरेकर, दाभाडा येथे स्नेहल प्रमोद राऊत, तर मंगरूळ दस्तगीर येथे विठ्ठल चव्हाण ईश्वरचिठ्ठीने विजयी झालेत.