१० लाख मतदार ठरविणार गावगाड्यातील पुढारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:11 IST2021-01-15T04:11:30+5:302021-01-15T04:11:30+5:30
पान २ चे लिड अमरावती : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत ...

१० लाख मतदार ठरविणार गावगाड्यातील पुढारी
पान २ चे लिड
अमरावती : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. १४ जानेवारीला तालुकास्तरावरून मतदान पथके मतदान यंत्रणेसह मतदान केंद्राकडे रवाना झालेत. कोरोनाची भीती दूर सारून तब्बल १० लाख मतदार ग्रामपंचायत सदस्य व त्यापैकीच एक होणा-या प्रस्तावित सरपंचपदाच्या उमेदवाराला मतदान करणार आहेत. निवडून आलेल्या सदस्यांपैकीच एकजण सरपंच होणार असल्याने गटातटाच्या राजकारणाने उचल घेतली आहे. ५३८ ग्रामपंचायतींमधील ४,४०८ सदस्यपदांसाठी हे मतदान होऊ घातले आहे. ४७३ उमेदवार अविरोध निवडून आले आहेत.
जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली. त्यानुसार १४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या व एका ग्रामपंचायतीत एकूण जागांपैकी काही जागांसाठी वैध नामनिर्देशन पत्र प्राप्त न झाल्याने, तसेच तेथील उर्वरित जागा बिनविरोध झाल्याने निवडणूक होणार नाही. उर्वरित ५३८ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १,९४८ मतदान केंद्रे असून, ५ लाख ६ हजार ८०४ महिला, ५ लाख ३३ हजार ३४४ पुरुष व इतर नऊ असे एकूण १० लाख ४० हजार १५९ मतदार आहेत. या संपूर्ण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी रात्रीचा दिवस केला. नेमके ते प्रयत्न कुणाला यशश्री मिळवून देते, हे १८ जानेवारी रोजी स्पष्ट होईल.
तालुका ग्रामपंचायत मतदान केंद्रे
अमरावती ४४ -१८०
भातकुली ३५- १२२ ,
नांदगाव खंडेश्वर ४७- १४४
दर्यापूर : ५०- १८३
अंजनगाव सुर्जी ३४- १४४
तिवसा २८- ९८
चांदूर रेल्वे २८- ९२
धामणगाव रेल्वे ५३- १८०
अचलपूर ४३- १५७
चांदूर बाजार ४०- १७१
मोर्शी ३७- १४५
वरूड ४१- १५५
धारणी ३५- ११२
चिखलदरा २३- ६५
----------------------