शिवसेना विरोधी पक्षनेता पदाला ग्रहण
By Admin | Updated: December 20, 2014 22:31 IST2014-12-20T22:31:57+5:302014-12-20T22:31:57+5:30
महापालिकेत शिवसेना विरोधी पक्षनेतेपदाचा वाद कायम आहे. खा. आनंदराव अडसूळ यांनी दिगंबर डहाके यांच्या जागी प्रवीण हरमकर यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्याबाबतचे पत्र महापालिकेत पाठविले आहे.

शिवसेना विरोधी पक्षनेता पदाला ग्रहण
विभागीय आयुक्तांकडे चेंडू : बसपा, राष्ट्रवादी गटनेता पदाचाही वाद
अमरावती : महापालिकेत शिवसेना विरोधी पक्षनेतेपदाचा वाद कायम आहे. खा. आनंदराव अडसूळ यांनी दिगंबर डहाके यांच्या जागी प्रवीण हरमकर यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्याबाबतचे पत्र महापालिकेत पाठविले आहे. मात्र मागील दोन सभांमध्ये काहीही निर्णय झाला नाही. अखेर हा वाद विभागीय आयुक्तांच्या कक्षात पोहचला आहे. बसपा, राष्ट्रवादी काँग्रेस गटनेता पदाचाही वाद सुरु आहे.
प्रशांत वानखडे यांनी विद्यमान विरोधी पक्षनेता दिगंबर डहाके यांनी या बाबत काही पत्र दिले असेल तर त्याअनुषंगाने सभागृहात अवगत करावे, असे ते म्हणाले. यावेळी दिगंबर डहाके यांनी विरोधी पक्षनेता पदावरुन अडीच वर्षांनंतर हटविले जाते. मात्र मला महिन्याभराचा आत हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी याविषयी निर्णय दिल्यास तो मान्य राहील, असे डहाके म्हणाले. तेंव्हा महापौरांनी हा विषय थांबविण्याचे निर्देश दिलेत. दरम्यान सुर्वण जयंती शहरी रोजगार योजनेचे स्वरुप बदलत असल्याचा पार्श्वभूमिवर ही योजना नव्या रुपात येत आहे. ५ कोटी रुपये विविध योजनांवर खर्च होत असताना हे अनुदान खर्च करण्याच्या प्रक्रियेवर आक्षेप घेण्यात आला. प्रदीप दंदे, निलीमा काळे, अजय गोंडाणे, अर्चना इंगोले, प्रवीण हरमकर, कांचन ग्रेसपुंजे, वंदना हरणे, छाया अंबाडकर, अजय सामदेकर आदींनी आक्षेप घेतला. सभागृहात चर्चा झाल्याशिवाय हे अनुदान खर्च होणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. उशिरा रात्रीपर्यंत सभा सुरूच होती.