डिसेंबरमध्ये एलबीटीचे उत्पन्न ९० लाखांनी घसरले
By Admin | Updated: January 4, 2015 23:02 IST2015-01-04T23:02:37+5:302015-01-04T23:02:37+5:30
महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत असलेल्या स्थानिक संस्था कर( एलबीटी)चे डिसेंबर महिन्याचे उत्पन्न ९० लाखांनी घरसले आहे. आतापर्यंत एलबीटी वसुली ४० कोटींनी मागे असल्याचे

डिसेंबरमध्ये एलबीटीचे उत्पन्न ९० लाखांनी घसरले
अमरावती : महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत असलेल्या स्थानिक संस्था कर( एलबीटी)चे डिसेंबर महिन्याचे उत्पन्न ९० लाखांनी घरसले आहे. आतापर्यंत एलबीटी वसुली ४० कोटींनी मागे असल्याचे आयुक्त अरुण डोंगरे यांचे म्हणणे आहे. मार्च महिन्यापर्यंत एलबीटी उत्पन्नातील घसरण कायम राहणार असल्याचे संकेत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येत्या एप्रिलपासून राज्यात जीएसटी ही नवी कर प्रणाली लागू होणार असल्याची घोषणा केली आहे. परिणामी स्थानिक व्यापाऱ्यांनी एलबीटी भरण्यात हात आखुडता घेतला. हेच चित्र कायम राहिल्यास मार्चपर्यंत एलबीटीचे उत्पन्न भरून निघण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. दिवाळीनंतरच्या नोव्हेंबर महिन्यात एलबीटीचे उत्पन्न व्यवस्थित होते. दरम्यान शासनकर्त्यांनी एलबीटी बंदची घोषणा केली. त्यामुळे सुरळीत एलबीटी भरणाऱ्या व्यापाऱ्यांनी देखील उपकर न भरण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते. डिसेंबर महिन्यात चक्क ९० लाखांनी उत्पन्न घसरले. भरणा थांबल्याने महापालिकेची आर्थिक स्थिती ढासळली आहे.