शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांना विक्री करण्यासाठी
वलगाव : बाजारामध्ये ज्या बाबीची मागणी असेल, त्याच पद्धतीने शेतकऱ्यांनी पीक घ्यावे, या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेतून अमरावती तालुक्यातील रेवसा येथील शेतकऱ्यांच्या शेतातील भाजीपाला थेट ग्राहकांसाठी उपलब्ध देण्यात आला.
बुधवारी या अभियानाला प्रारंभ झाला. ते जिल्हाभर यशस्वीपणे राबविण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत. त्यानुसार कृषी विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध ठिकाणी शेतकऱ्यांचे भाजीपाला व फळे विक्री केंद्राचे उपक्रम राबविले जाणार आहेत. या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळतील तसेच ग्राहकांना दर्जेदार, ताजा भाजीपाला वाजवी दरामध्ये उपलब्ध होणार असल्याचे यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती रोडगे म्हणाल्या. भाजीपाला स्टॉलवर उपस्थित शेतकरी बांधवांना ओळखपत्र राहणार आहे.
अमरावती तालुका कृषी अधिकारी के.एम. हतागळे, मंडळ कृषी अधिकारी नीता कवाणे, (मंडळ कृषी अधिकारी), रोहिणी उगले, अविनाश पांडे, सोनाली पंडित, रूपाली चौधरी, व्ही.व्ही. वानखडे आदी याप्रसंगी उपिस्थत होते.