बाजार समितीच्या टीएमसी यार्डात खासगी कापूस खरेदीचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:40 IST2020-12-17T04:40:43+5:302020-12-17T04:40:43+5:30

(फोटो आहे.) अमरावती : कापूस हंगाम २०२०-२१ मधील खासगी कापूस खरेदीला बुधवारी शुभारंभ करण्यात आला. बाजार समितीचे सचिव दीपक ...

Launch of private cotton procurement at Market Committee's TMC Yard | बाजार समितीच्या टीएमसी यार्डात खासगी कापूस खरेदीचा शुभारंभ

बाजार समितीच्या टीएमसी यार्डात खासगी कापूस खरेदीचा शुभारंभ

(फोटो आहे.)

अमरावती : कापूस हंगाम २०२०-२१ मधील खासगी कापूस खरेदीला बुधवारी शुभारंभ करण्यात आला. बाजार समितीचे सचिव दीपक विजयकर यांच्या हस्ते शेतकऱ्याला पेढा भरवून टीएमसी यार्डात कापूस खरेदी करण्यात आली.

शेतकरी सतीश रामदास पाटील (रा. चिंचोली काळे) यांच्या प्रथम वाहनाचे पूजन व त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कापूस खरेदीदार राजकुमार पमनाणी यांनी लिलावाव्दारे बोली लावून कापसाला प्रतीकिंव्टल ५५०१ भाव दिला. यावेळी बाजार समितीचे सचिव दीपक विजयकर यांनी खरेदीदार राजकुमार पमनाणी व अडते अमोल कडू यांचेही स्वागत केले. याप्रसंगी अडते खरेदीदार इब्राहीम, दीपक मंत्री, प्रशांत कडू, अनिल पनपालीया, समितीचे कापूस विभागप्रमुख प्रवीण पवार, राजेश इंगोले उपस्थित होते.

Web Title: Launch of private cotton procurement at Market Committee's TMC Yard