पोलीस मदत केंद्राचा शुभारंभ
By Admin | Updated: December 29, 2014 02:59 IST2014-12-29T02:59:10+5:302014-12-29T02:59:10+5:30
जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्या निर्देशानुसार शहरातील ..

पोलीस मदत केंद्राचा शुभारंभ
चांदूरबाजार : जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्या निर्देशानुसार शहरातील अतिसंवेदनशील समजले जाणाऱ्या ताजलाईनमध्ये प्रथमच पोलीस मदत केन्द्र सुरु करण्यात आले.
गेल्या दोन-तीन वर्षांपासून शहरात लहान-मोठ्या घडत असलेल्या घटनांमुळे चांदूरबाजार शहर अतिसंवेदनशील असल्याचे जाहीर झाले आहे. त्यानुसार शहरातील मध्यभागी असलेल्या ताजलाईन येथे नेहमीच तंटे सुरुच असतात. या पार्श्वभूमीवर तसेच नागरिकांच्या मागणीनुसार जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी या ताजलाईन परिसरात पोलीस मदत केंद्र सुरु करण्याचे निर्देश दिल्याने ठाणेदार दिलदार तडवी यांनी तातडीने ताजलाईन परिसरात पोलीस मदत केंद्र सुरु केले. नगरपालिकेतर्फे जागा उपलब्ध करुन देण्यात आली. ठाणेदार तडवी व नगरपरिषद मुख्याधिकारी विजय देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस मदत केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. (शहर प्रतिनिधी)