‘लोकमत-रायसोनी’च्या नृत्य कार्यशाळेचा शुभारंभ

By Admin | Updated: June 1, 2015 00:37 IST2015-06-01T00:37:34+5:302015-06-01T00:37:34+5:30

‘लोकमत’ सखी मंच व रायसोनी ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने शहरात ठिकठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या...

Launch of 'Lokmat-Raisoni' dance workshop | ‘लोकमत-रायसोनी’च्या नृत्य कार्यशाळेचा शुभारंभ

‘लोकमत-रायसोनी’च्या नृत्य कार्यशाळेचा शुभारंभ

चार ठिकाणी उद्घाटन : महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अमरावती : ‘लोकमत’ सखी मंच व रायसोनी ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने शहरात ठिकठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘नृत्य कार्यशाळे’चा थाटात शुभारंभ रविवारी करण्यात आला. चार ठिकाणी या डान्स वर्कशॉपचा शुभारंभ पार पडला.
सुयोेग प्रायमरी स्कूल, फरशी स्टॉप येथे शिव ठाकरे, देवरणकरनगर येथे किरण भेले, खापर्डे बगिचा येथे सीमा वानखडे तर ‘लोकमत भवन’ येथे नितीन आसुदानी यांच्या हस्ते डान्स वर्कशॉपचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी रायसोनी ग्रुपचे उपाध्यक्ष हेमंत सोनारे, रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रवीण वानखडे, रवींद्रसिंह चौहान, मंगेश निचत उपस्थित होते. त्याचप्रमाणे ‘लोकमत’चे जयंत कौलगिकर, स्वाती बडगुजर, शीतल चौहाण आदींचीही उपस्थिती होती.
या नृत्य कार्यशाळेची नोंदणी ३ जूनपर्यंत करता येईल. नृत्य कार्यशाळेत सर्वांना मोफत प्रवेश मिळू शकेल. या नृत्य कार्यशाळेमध्ये लोकमत सखी मंच, युवा नेक्स्ट, बालविकास मंच, वाचकवर्ग सहभागी होऊ शकेल. कार्यशाळेत बॉलिवूड, कन्टेम्पररी, फ्री स्टाईल, हिपॉप, जॅझ, साल्सा आदी नृत्य प्रकारांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सायंकाळी ४ ते ७ च्या दरम्यान ३१ मे ते १० जून पर्यंत ही कार्यशाळा सुरू राहणार आहे. या कार्यशाळेचा ग्रँड फिनाले १४ जून रोजी सायंकाळी ६ ते १० वाजेपर्यंत संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात होईल. सदस्यता नोंदणीकरिता इच्छुकांनी रविंद्र चौहान (९९६०२०५६४०), मंगेश निचत (९८९०१६४८६७) यांच्याकडे करावी, असे कळविण्यात आले आहे.

नृत्य कार्यशाळेचे स्थळ
सुयोग प्रायमरी स्कूल, एसबीआयसमोर, फरशी स्टॉप (शिव ठाकरे)
जनार्दन वैद्य यांच्या गरी, ७ रोड, किरणनगर (केशव वैद्य)
सतिश व सागर डान्स अकादमी, साईनगर पोस्ट आॅफीसजवळ, साईनगर (सतिश ठाकरे, सागर देशमुख)
योग भवन, हेमंत डान्स क्लासेसमोर, मालटेकडीजवळ, श्यामनगर (नरेंद्र भुयार)
देवरणकरनगर, समर्थ हायस्कूल बडनेरा रोड (किरण भेले),
सीमा डान्स क्लासेस, खापर्डे बगिचा (सीमा वानखडे)
‘लोकमत’ कार्यालय, जिल्हा स्टेडियमजवळ (नितीन आसुदानी)

Web Title: Launch of 'Lokmat-Raisoni' dance workshop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.