गणेश विसर्जनाला प्रारंभ
By Admin | Updated: September 8, 2014 00:54 IST2014-09-08T00:54:45+5:302014-09-08T00:54:45+5:30
गणेश विसर्जनाला प्रारंभ झाला असून रविवारी १२० मंडळांनी बाप्पांना निरोप दिला. यामध्ये शहरातील १८ व जिल्ह्यातील १०२ मंडळाचा समावेश होता.

गणेश विसर्जनाला प्रारंभ
अमरावती : गणेश विसर्जनाला प्रारंभ झाला असून रविवारी १२० मंडळांनी बाप्पांना निरोप दिला. यामध्ये शहरातील १८ व जिल्ह्यातील १०२ मंडळाचा समावेश होता.
यावर्षी शहरात ५१४ सार्वजनिक गणेश मंडळांनी बाप्पांची स्थापना केली. यामध्ये ३६ गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’चा समावेश आहे. ग्रामीण भागात ११६४ सार्वजनिक गणेश मंडळानी बाप्पांची स्थापना केली. त्यात १५५१ ठिकाणी ‘एक गाव एक गणपती’ंचा समावेश आहे. भक्तांनी आनंदाने दहा दिवस गणेशोत्सव साजरा केल्यानंतर आता बाप्पाला निरोप देणे सुरु झाले आहे. विसर्जनादरम्यान शहरासह जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
छत्री तलाव व प्रथमेश तलाव येथे सावर्जनिक गणेश मंडळांच्या मुर्तीच्या विसर्जनाची सोय केली असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. १४ सप्टेंबरपर्यंत गणेश विसर्जन होणार असून यामध्ये सोमवारी २१२, मंगळवारी १९०, गुरुवारी ७५, शुक्रवारी १६, शनिवारी ०२ व रविवारी एका मंडळांचा समावेश आहे.
ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका काढून भक्तगण सर्वत्र बाप्पांना अखेरचा निरोप देत आहे. गणेश विसर्जनादरम्यान शांतता भंग न होता आनंदाने बाप्पाला निरोप देण्याचे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.
सोमवारी सकाळी १०.४६ वाजता गणेश विसर्जनाचा मुहूर्त
जिल्ह्यामध्ये २९ आॅगस्ट रोजी गणेशाची उत्साहात स्थापन करण्यात आली. आता गणेश स्थापनेला १० दिवस पूर्ण झाले असून गणेशाला निरोप देण्याची वेळ आली आहे. सोमवारी सकाळी १०.४६ वाजता गणेश विसर्जनाचा मुहूर्त असल्याचे पंडित नितीन हळवे यांनी सांगितले. रविवारी दुपारी २.२९ वाजतापासून अनंत चर्तुदशीला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे रविवारपासूनच गणेश विसर्जनाला भाविकांनी सुरुवात केली आहे. सोमवारी सकाळी १०.४६ वाजताच्या मुहूर्ताची तिथी सुर्याने बघितलेली आहे. त्यामुळे सकाळी १०.४६ च्या मुहूर्तावर गणपती मूर्ती हलवून दिवसभरात कधीही गणेश विर्सजन करता येऊ शकते, असे हळवे गुरुजींनी सांगितले.