नेरपिंगळाई येथे २५ खाटांच्या कोविड केअर सेंटरला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:12 IST2021-05-07T04:12:52+5:302021-05-07T04:12:52+5:30
मोर्शी : तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोना संक्रमितांची वाढती संख्या लक्षात घेता, नेरपिंगळाई येथे तालुक्यातील दुसरे कोविड उपचार ...

नेरपिंगळाई येथे २५ खाटांच्या कोविड केअर सेंटरला सुरुवात
मोर्शी : तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोना संक्रमितांची वाढती संख्या लक्षात घेता, नेरपिंगळाई येथे तालुक्यातील दुसरे कोविड उपचार केंद्र डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय अमरावतीच्या वतीने सुरु झाले आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या केंद्रावर २५ खाटांची व्यवस्था असून, तेथे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पुरेसा औषध साठा व भोजन सुविधा मिळणार आहे,
ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालला आहे. यामध्ये मोर्शी, वरूड व अन्य तालुक्यांमध्ये कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने ग्रामीण भागात कोरोनाची चिंताजनक स्थिती आहे. रुग्णावर उपचार व विलगीकरण करण्याचे दृष्टीने या केंद्राची सुरुवात करण्यात आल्याचे व या केंद्राचा रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, पीडीएमसीचे संचालक डॉ. पद्माकर सोमवंशी, अधिष्ठाता डॉ. अनिल देशमुख तसेच अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.