शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
2
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
3
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
4
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
5
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
6
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
7
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
8
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
9
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
10
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
11
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
12
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
13
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
14
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
15
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
16
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
17
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
18
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
19
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
20
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!

अन् ती भीक मागून भरते पोटाची खळगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 5:00 AM

हातावर कमावून कुटुंबाचे पालन पोषण करणारे साहेबराव इंगळे शहापूर पुनर्वसनमध्ये झोपडी वजा घरात २० वर्षीय सीता आणि १२ वर्षीय आकाश या मुलासोबत पत्नी शशिकलासोबत राहतात. पत्नीला डोळ्याचा आजार झाल्याने शस्त्रक्रियेदरम्यान ती अंध झाली. मुलगा आणि मुलगीसुद्धा जन्मत:च अंध असल्याने संसाराचा गाडा साहेबराव इंगळेंवर होता. भूमिहीन असल्याने मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदनिर्वाह ते भागवित होते.

ठळक मुद्देमुला-मुलींसह माताही आंधळी, पती अपंग : शहापूरच्या इंगळे परिवाराची फरफट

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : गरिबीचे जीणे जगत असताना अचानक नियतीचा फेरा पालटला अन् मातेसह दोन अपत्यही अंध झाली. कुटुंबातील कर्ता पुरुष मोलमजुरी करून उदरनिर्वाह भागवित होता. परंतु अपघातात तोही दोन्ही पायांनी अपंग झाला. पत्नीपुढे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा यक्ष प्रश्न निर्माण झाल्यामुळे दोन अंध अपत्यांसह अंध मातेवर शहरात भीक मागून दोन वेळची भूक भागविण्याची वेळ आली आहे.हातावर कमावून कुटुंबाचे पालन पोषण करणारे साहेबराव इंगळे शहापूर पुनर्वसनमध्ये झोपडी वजा घरात २० वर्षीय सीता आणि १२ वर्षीय आकाश या मुलासोबत पत्नी शशिकलासोबत राहतात. पत्नीला डोळ्याचा आजार झाल्याने शस्त्रक्रियेदरम्यान ती अंध झाली. मुलगा आणि मुलगीसुद्धा जन्मत:च अंध असल्याने संसाराचा गाडा साहेबराव इंगळेंवर होता. भूमिहीन असल्याने मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदनिर्वाह ते भागवित होते. दोन वर्षांपूर्वी एका भाजी विक्रेत्याकडे कामावर असताना राजुरा बाजार ते शहापूर पायी प्रवासात दुचाकीस्वाराने धडक देऊन जखमी केले. यात कायमचे अपंगत्व आल्याने कुटुंबावर उपासमार आली. परंतु अंध पत्नी शशिकला हिने धीर न सोडता दोन अपत्यांना गावातीलच शाळेत टाकले. परंतु अंध असल्याने शिक्षकांच्या मदतीने मुलीने ७ वी, तर मुलाने पाचवीपर्यंत शिक्षण घेतले. पुढील शिक्षण घेणे शक्य झाले नाही. वडिलांच्या अपंगत्वामुळे पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने आईसह दोन्ही अंध मुलांनी भीक मागून दिवसभरात जमलेल्या ५० ते १०० रुपयांमध्ये दोनवेळेची सांज भागविणे सुरू केले. साधा रास्ता ओलांडणेही त्यांना अशक्य असताना जीवावर बेतणारी भ्रमंती करून आईचा हात धरून ती मुले पैसे गोळा करतात. परंतु या अंध मायलेकांना दृष्टी येणे गरजेचे असल्याने प्रशासन, लोकप्रतिनिधीने लक्ष देऊन सहकार्य केल्यास या परिवाराची फरफट थांबून उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल होऊ शकेल, अशी सामाजिक कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. मरणयातना भोगून उपजीविका चालविणारे इंगळे नामक भूमिहीन कुटुंब शहापूर येथील आहे.सामाजिक बांधीलकीकु ठल्यातरी रूग्णालयात जाऊन रूग्णांना एक केळं देऊन फोटोसेशन केले जाते. सामाजिक कार्याचे अवडंबर केले जाते. मात्र, इंगळे कुटूंब दररोज दिसत असताना, त्यांना कुठलिही मदत केली जात नाही. त्यामुळे सामाजिक बांधीलकी जोपासणारे तथाकथित सामाजिक कार्यकर्ते जातात, तरी कु ठे? असा सवाल वरूडकरांमधून विचारला जात आहे.