प्रसादात निघाल्या अळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2016 23:57 IST2016-07-09T23:57:04+5:302016-07-09T23:57:04+5:30

साईनगरातील श्री साईबाबा ट्रस्ट अनेक दिवसांपासून चर्चेत असताना आणखी एक विवादित मुद्दा पुढे आला आहे.

The larvae that went in the process | प्रसादात निघाल्या अळ्या

प्रसादात निघाल्या अळ्या

श्री साईबाबा संस्थान : तक्रार वहीत नोंद
अमरावती : साईनगरातील श्री साईबाबा ट्रस्ट अनेक दिवसांपासून चर्चेत असताना आणखी एक विवादित मुद्दा पुढे आला आहे. संस्थाकडून देण्यात आलेल्या शाश्वत अन्नदान प्रसादात अळ्या निघाल्याने भाविकांमध्ये रोष उफाळून आला होता. यासंदर्भात भाविकांनी संस्थेच्याच तक्रार विहित नोंद केली असून भाविक धर्मादाय आयुक्तांकडे सुद्धा तक्रार करणार आहेत.
साईनगरातील श्री साईबाबा ट्रस्टने सार्वजनिक जागेचा व्यावसायिक उपयोग केल्याचे काही महिन्यांपूर्वी उघड झाले. माजी व्यवस्थापक अविनाश ढगे यांच्या तक्रारीवरून साईबाबा ट्रस्टवर कारवाईसुद्धा कारवाईसुद्धा करण्यात आली आहे. त्यामुळे साईबाबा ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला होता. या संस्थानात हजारो भाविक दान करतात. त्यामुळे दानपेटीत लाखो रुपये जमा होतात. तसेच अनेक जण कडधान्यसुद्धा दान स्वरुपात देतात. त्या अनुषंगाने संस्थानकडून दर गुरुवारी शाश्वत अन्नदान केले जाते. भाविकांनी केलेल्या दानातून हे अन्नदान केले जात असून दानदात्या भाविकांना डब्ब्यात पँकिंग करून प्रसाद दिला जातो. दर गुरुवारी साधारणात १३० डब्बे प्रसाद भाविकांना दिला जातो, तसेच १ हजारावर भाविक प्रसादाचा लाभ घेतात. ७ जुलै रोजीच्या गुरुवारी साईनगरातील रहिवासी निर्मलसिंग खालसा यांनी मंदिरात जाऊन प्रसाद घेतला आणि ते घरी गेले. प्रसाद खाण्यापूर्वीच त्यांना भातात पांढऱ्या अळ्या आढळून आल्यात. यापूर्वीही एकदा या प्रसादातील भाजीत खालसा यांना अळ्या आढळून आल्या होत्या. त्यामुळे संतप्त झालेले खालसा यांनी ही बाब संस्थान पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली.

पदाधिकाऱ्यांना विचारला जाब
अमरावती : वारवांर घडणाऱ्या हा प्रकार थांबत नसल्याचे पाहून खालसा यांनी अखेर शनिवारी पुन्हा साईबाबा संस्थान गाठून पदाधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यामुळे भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. खालसा यांनी संस्थानच्या तक्रार वहीत अन्नदानातील या प्रकाराची नोंद केली असून ते आता धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार करणार आहेत. (प्रतिनिधी)ं

साईबाबा मंदिरात आम्ही श्रध्देने जातो. मात्र, संस्थानचे पदाधिकारी भाविकांच्या श्रद्धेचा विचार करीत नाहीत. १५ दिवसांपूर्वी अन्नदानातील वांग्याच्या भाजीत अळ्या निघाल्या. ७ जुलैच्या गुरुवारी भातात अळ्या निघाल्या. यामुळे भाविकांच्या भावनाशी हा खेळच सुरू आहे. यासंदर्भात तक्रारवहीत नोंद केली.
- निर्मलसिंग खालसा,
साईनगर रहिवासी

आम्ही स्वयंपाक करण्याचा कंत्राट दिला आहे. त्यांच्यावर आमची देखरेख असते. मात्र, अनावधानाने ही चूक झाली असावी. धान्य निवडणारे व स्वयंपाक बनविणाऱ्यांची आम्ही चौकशी करू.
- शरद दातेराव, सचिव, श्री साईबाबा संस्थान, साईनगर

Web Title: The larvae that went in the process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.