धामणगाव रेल्वे तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:12 IST2021-01-21T04:12:34+5:302021-01-21T04:12:34+5:30

धामणगाव रेल्वे : जुना धामणगाव येथील काँग्रेसचे संजय तायडे यांच्या नेतृत्वातील साईबाबा विकास पॅनेलचे ऋषी जगताप, पुष्पा हाडे, शोभा ...

Large Gram Panchayats in Dhamangaon Railway Taluka | धामणगाव रेल्वे तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायती

धामणगाव रेल्वे तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायती

धामणगाव रेल्वे : जुना धामणगाव येथील काँग्रेसचे संजय तायडे यांच्या नेतृत्वातील साईबाबा विकास पॅनेलचे ऋषी जगताप, पुष्पा हाडे, शोभा घुंगरूड, हर्षा तायडे, आशा ढोक, सोनू बनसोड, पूजा आरेकर हे उमेदवार विजयी झाले. भाजप समर्थित शेतकरी सन्मान पॅनलचे विश्वेश्वर दिघाडे, प्रफुल ढाले, अतुल वेळूकार, दिनेश गंधे, सतीश भलावी, वर्षा महात्मे, स्वाती तेलंगे हे विजयी झाले आहेत. सदस्य म्हणून विशाल पोळ व विनोद तायडे हे आपाआपल्या स्वतंत्र गटात विजयी झाले आहे.

------------

तळेगावात परिवर्तन पॅनेलला बहुमत

तळेगाव दशासर : धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर या मोठ्या गावात काँग्रेस समर्थित परिवर्तन पॅनेलने बहुमत मिळविले.

प्रभाग १ मध्ये जनता पॅनेलचे मनीष कुयटे, मनोज पेंदाम, भारती चुटे हे विजयी झाले. प्रभाग २ मध्ये गजानन झिटे (जनता पॅनेल) व मनोज आठवले, मीनाक्षी ठाकरे (परिवर्तन पॅनेल) विजयी झाले. प्रभाग ३ मधून आशा ठाकरे (परिवर्तन पॅनेल) व परवीन अन्सारी (जनता पॅनेल), प्रभाग ४ मधून रमाकांत इंगोले, सुषमा नंदागवळी, सुचिता चकधरे (परिवर्तन पॅनेल), प्रभाग ५ मध्ये भाजप समर्थित ज्योत्स्ना महल्ले व पुरुषोत्तम उडाखे, गवळी (परिवर्तन पॅनेल), तर प्रभाग ६ मधून नंदा बैलकर, रोशनी गुल्हाने (परिवर्तन पॅनेल) व अपक्ष श्याम डेहनकर हे विजयी झाले.

Web Title: Large Gram Panchayats in Dhamangaon Railway Taluka