रेल्वे पोलिसाने परत केला लॅपटॉप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 06:00 IST2019-11-08T06:00:00+5:302019-11-08T06:00:57+5:30
मदन वानखडे असे रेल्वे प्रवाशांचे लॅपटॉप आणि बॅर्ग परत करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. वानखडे हे अमरावती रेल्वे पोलीस ठाण्यात जमादारपदी कार्यरत आहेत. मदन वानखडे हे २ नोव्हेंबर रोजी अमरावती रेल्वे स्थानकावर कर्तव्यावर असताना त्यांना अकोला येथील रेल्वे पोलिसांनी पुणे-अमरावती एक्स्प्रेसमध्ये सामान्य डब्यात हिरवट रंगाची बॅग असल्याची माहिती दिली.

रेल्वे पोलिसाने परत केला लॅपटॉप
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पोलिसांबाबत जनमाणसात फारशे चांगले मत दिसून येत नाही. मात्र, पोलीस हासुद्धा माणूसच आहे. त्यांनाही संवेदना, मानवी भावना आहे. हीच प्रचिती गुरूवारी अमरावती रेल्वे स्थानकावर कर्तव्यावरील एका रेल्वे पोलिसांकडून दिसून आली. एका प्रवाशाचे लॅपटॉप आणि महिलेची बॅग परत करून त्यांनी ‘सद रक्षणाय खल निग्रहनाय’ याची जाणीव करून दिली.
मदन वानखडे असे रेल्वे प्रवाशांचे लॅपटॉप आणि बॅर्ग परत करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. वानखडे हे अमरावती रेल्वे पोलीस ठाण्यात जमादारपदी कार्यरत आहेत. मदन वानखडे हे २ नोव्हेंबर रोजी अमरावती रेल्वे स्थानकावर कर्तव्यावर असताना त्यांना अकोला येथील रेल्वे पोलिसांनी पुणे-अमरावती एक्स्प्रेसमध्ये सामान्य डब्यात हिरवट रंगाची बॅग असल्याची माहिती दिली. त्यानुसार डब्यात पाहणी करून जमादार वानखडे यांनी ही बॅग ताब्यात घेत रेल्वे पोलीस ठाण्यात जमा केली. या बॅगमध्ये आढळलेल्या माहितीनुसार, ती बॅग गणपती अर्जुने (२५, रा. सुगाव, ता. चाकुर जि. लातूर) यांची असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार मदन वानखडे यांनी सदर प्रवाशांसोबत संपर्क साधला आणि ५६ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप आणि १० हजार रुपये किमतीची सेव्हींग मशीन असे एकूण ५८ हजारांचे साहित्य परत केले. तसेच ४ नोव्हेंबर रोजी अमरावती रेल्वे स्थानकावर जबलपूर -अमरावती एक्स्प्रेसमध्ये बेवारस स्थितीत एक बॅग आढळली. चौकशीअंती शोध घेतला असता ही बॅग यवतमाळ येथील शिवानी रामकृ ष्ण शुक्ला (२५) यांची असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार या युवतीला तीच बॅग साहित्य, रोख रकमेसह गुरुवारी परत करण्यात आली. जमादार मदन वानखडे यांच्या कामागिरीबाबत रेल्वे पोलिसांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.